अक्षय शिंदे
जालना : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याबाबत सरकारने निर्णय घेतला आहे. यानंतर धनगर व बंजारा समाज आरक्षणासाठी आंदोलनाला उतरला आहे. त्यानुसार हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा; या मागणीसाठी बंजारा समाजाकडून पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसत आक्रमक भूमिका घेत बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
जालनाशहरातल्या अंबड चौफुली भागात विजय चव्हाण या बंजारा बांधवाने मागील 3 दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस असून ज्या पद्धतीने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू झालं आहे. त्यानुसार बंजारा समाजालाही आरक्षण लागू करत एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी यावेळी उपोषणकर्त्याने केली आहे. असे न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Ahilyanagar : पाच डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल होऊनही अटक नाही; ठाकरे गट आक्रमकआंदोलन चिघळण्याची शक्यता
दरम्यान विजय चव्हाण या आंदोलनकर्त्याने नऊ दिवसाच्या उपोषणानंतर दहाव्या दिवशी मला या ठिकाणाहून उचला आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन जाळून टाका; असे देखील समाज बांधवांना सांगितलं असल्याचा इशारा उपोषण कर्ते विजय चव्हाण यांनी दिला आहे. यामुळे सदरचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Hingoli Crime : शुल्लक कारणातून व्यापाऱ्याला दोघांची मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैदउपोषणस्थळी साजरी करणार दिवाळी
दरम्यान चार दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणाची दखल प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही. यामुळे समाज बांधव आक्रमक झाले आहेत. तर उद्या जालना जिल्ह्यातल्या बंजारा समाजातर्फे घरी दिवाळी साजरी न करता उपोषणस्थळी येऊन दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उद्या बंजारा समाज बांधव जालन्यात अंबड चौफुली भागातील उपोषण स्थळी येथे आपली दिवाळी साजरी करणार आहे.