सातारा : तालुक्यातील लिंब जिल्हा परिषद गटासह लिंब व कोंडवे हे दोन्ही गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. गटासह या दोन गणांतून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गावोगावी कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. या तिन्ही ठिकाणी उमेदवार देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांचा कस लागणार आहे; पण इच्छुकांना माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या राष्ट्रवादीचा आधार राहणार आहे.
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवापूर्वी हा शाहूपुरी गट होता. त्यात शाहूपुरी व कोंडवे गण होता. यामध्ये बदल होऊन शाहूपुरी नगरपालिकेत समावेश झाल्यामुळे कोंडवेपुढील गावे किडगाव गणात गेली आहेत. आता नव्या रचनेत लिंब गट झाल्याने लिंब व कोंडवे गण झाला आहे. लिंब गट हा पारंपरिकपणे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा बालेकिल्ला मानला जातो.
लिंब गणात लिंब, नागेवाडी कुशी, नेले-किडगाव, पिंपळवाडी, धावडशी, कळंबे, चिंचणी आदी गावे आहेत, तर कोंडवे गणात कोंडवे, सैदापूर, इंगळेवाडी, गवडी, कण्हेर, आंबेदरे, वेळेकामथी या गावांचा समावेश आहे. लिंब गटावर मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे वर्चस्व असले तरी काही गावांवर खासदार उदयनराजे भोसले यांचीही मजबूत पकड आहे. दोन्ही राजेंचे समर्थक कार्यकर्ते या भागात सक्रिय असल्याने त्यांच्यातील समन्वय हा आगामी निवडणुकीचा प्रमुख मुद्दा असेल. पूर्वी हा गट जावळी विधानसभा मतदारसंघात होता, त्यामुळे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचाही प्रभाव काही गावांत जाणवतो.
लोकसभा निवडणुकीत त्यांना या भागातून चांगली मते मिळाली होती. त्यामुळे त्यांचीही भूमिका निर्णायक ठरू शकते. साधारणत: ४५ हजार मतदार असलेल्या या गटात सध्या भाजपचे तालुकाध्यक्ष महेश गाडे, खासदार उदयनराजेंचे समर्थक लक्ष्मण कडव, बाळासाहेब चोरगे, पैलवान नीलेश पाटील, नामदेवराव सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप चव्हाण, माजी सभापती सरिता इंदलकर, माजी सरपंच ॲड. अनिल सोनमळे, संभाजी इंदलकर, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव सावंत, दिलीप निंबाळकर, बाळासाहेब ननावरे, इंद्रजित ढेंबरे, दादासाहेब बडदरे, महेश पाटील आदींची नावे चर्चेत आहेत.
लिंब गणात ॲड. विजय इंदलकर, दत्तात्रय पाटील, उमेश फाळके, धर्मेंद्र सावंत, प्रभाकर पवार यांच्या नावाची चर्चा आहे. कोंडवे गणात माजी सभापती धर्मराज घोरपडे, एकनाथ इंगळे, विश्वजित लाड, संजीवनी धनवे, गणेश निंबाळकर, दादासाहेब बडदरे, संभाजी इंदलकर, मच्छिंद्र गोगावले, धैर्यशील पवार यांची नावे पुढे येत आहेत. लिंब गट व दोन्ही गण खुले झाल्याने उमेदवार निश्चित करताना नेत्यांची मोठी कसोटी लागणार आहे. काही इच्छुकांना तिकीट न मिळाल्यास ते स्वबळावर लढण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर काहीजण अजूनही ‘बाबाराजे म्हणतील तेच,’ या भूमिकेवर ठाम आहेत; पण उमेदवारीसाठी दोन्ही राजेंसोबतच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाही पर्याय येथील इच्छुकांपूढे आहे. सध्या सर्व खुले असल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. कोणाला उमेदवारी मिळणार? यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यासाठी नेत्यांचा मात्र कस लागणार आहे.
गटातील प्रमुख प्रलंबित प्रश्न...पाणंद व स्मशानभूमी रस्ते अपूर्ण
कण्हेर धरण असूनही पर्यटनाला
चालना देणे आवश्यक
आयटी पार्कला चालना मिळावी.चौकटीतील मजकूर चौकटीतील मजकूर चौकटीतील मजकूर चौकटीतील मजकूर
लिंब गटासह गणातून उमेदवारी मिळवण्यासाठी आता कार्यकर्त्यांची मोठी रस्सीखेच होणार आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने काहींच्या नजरा या महाविकास आघाडीच्या उमेदवारीकडेही आहेत. त्यामुळे ‘इकडे नाही जमले, तर तिकडे आहेच’ असे धोरण काहींनी ठेवले आहे. गटातील लिंब व कोंडवे हे दोन्ही गण खुले झाल्याने स्थानिक पातळीवर चुरशीची स्पर्धा होणार आहे.