Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत पावसाचा हाहाकार! विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस, आज ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा
Saam TV October 23, 2025 02:45 AM

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची हजेरी

११ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा यलो अलर्ट जारी

दिवाळीच्या काळात उकाडा आणि विजांसह पावसाची शक्यता

नागरिकांना सतर्क राहण्याचं हवामान विभागाचं आवाहन

राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा ताप कायम असताना पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम असला तरी उन्हाची झळ काहीशी कमी होण्यास मदत होणार आहे. आज महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यात विजांसह पाऊस, ढगाळ हवामान, उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात उकाडा कायम असताना काल मुंबई, कोकण, यवतमाळ, वाशीम, नंदुरबार या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. ढगाळ हवामान आणि पावसाने हजेरी लावलेल्या भागात उन्हाचा चटका कमी होता. किमान तापमानात घट होऊ लागल्याने पहाटे गारवा वाढू लागला आहे. मंगळवारी पहाटे पर्यंतच्या २४ तासांत सांताक्रुझ येथे ३५.९ अंश सेल्सिअस, ‎‎रत्नागिरी, ‎ब्रह्मपुरी येथे ३५ अंशांपेक्षा अधिक, तर अकोला, जळगाव, अमरावती, डहाणू येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

KDMC : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचं ठिय्या आंदोलन; बोनस न मिळाल्याने संताप व्यक्त

आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्टचा इशारा दिला आहे. रायगड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह, मुख्यतः कोरडे हवामान आणि उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Pune Transport News : एक कार्ड, अनेक सुविधा! प्रवाशांचा वेळ वाचणार, ‘वन पुणे कार्ड’वर मेट्रो आणि पीएमपी बस प्रवास

ऐन दिवाळीत उकाड्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची उघडीप कायम असल्याचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.