Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?
Saam TV October 23, 2025 09:45 AM

शरद पवार गटाचे युवक नेते अमित भांगरे यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दुसऱ्यांदा भेटीला

या नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा

या नेत्यांच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अमित भांगरे आणि त्यांच्या आई सुनीता भांगरे यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता

सचिन बनसोडे, साम टीव्ही

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजप नेते काही भागात ऑपरेशन लोटसही राबवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑपरेशन लोटससाठी सोलापुरात मंत्री जयकुमार गोरे मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा सपाटा लावला आहे. दिवाळी आणि निवडणुकीच्या धामधुमीदरम्यान भाजप हे शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. यादरम्यान शरद पवार गटाचे अमित भांगरे यांनी मंत्री विखे पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारगटाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे हे आज मंत्री विखे पाटलांच्या भेटीला पोहोचले. यावेळी अहिल्यानगरचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे, आई सुनीता भांगरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे भांगरेंनी राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली. यावेळी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड देखील बैठकीला उपस्थित होते.

Leopard Attack : आई जिंकली, बिबट्या हरला...! बिबट्याची शेपूट ओढत आईने केली लेकराची सुटका

दोन्ही नेत्यांची मागील १५ दिवसांत दुसर्यांदा भेट झाली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यात घडामोडींना वेग आला आहे. जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. त्यात सुनीता भांगरे अकोले तालुक्यातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भांगरे शरद पवारांची साथ सोडणार का, अशी चर्चा रंगली आहे. अमित भांगरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अमित भांगरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूकलढवली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.