टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात एडलेड ओव्हलमधील दुसर्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला मालिका विजयासाठी 265 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलिया या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे. या आर पारच्या लढाईत भारताने 9 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 264 धावा केल्या. टीम इंडियाला 250 पोहचवण्यात रोहित शर्मा याने प्रमुख भूमिका बजावली. तर श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह या चौघांनीही बॅटिंगने निर्णायक योगदान दिलं. त्यामुळे आता भारतीय गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करतात की ऑस्ट्रेलिया सामन्यासह मालिका जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.