चांदीची साठवणूक वाढली, परदेशातून भरपूर चांदी आली, परंतू बाजारातून गायब
Tv9 Marathi October 24, 2025 09:45 AM

तुम्हाला कल्पना असेल की, चांदीचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. चांदीचा भाव 1.82 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. इतकी मोठी किंमत असून देकील चांदीची मागणी कायम आहे. भारतात चांदीची मोठ्या प्रमाणात आयात झाली आहे. पण, चांदीच्या बाजारातून चांदीच गायब झाली आहे. सरकार त्यावर लक्ष ठेवून आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया.

चांदीचे दर 1,82,000 रुपये प्रति किलो

सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. चेन्नईत सोन्याचे दर 1,30,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचे दर 1,82,000 रुपये प्रति किलो झाले. किंमती जास्त असूनही देशातील सराफा केंद्र असलेल्या मुंबईतील झवेरी बाजारात खरेदीदारांची रांग कमी होत नाही. काही लोक सध्याच्या किंमतीपेक्षा 30,000 रुपये जास्त देण्यास तयार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वेगवान मागणी आणि सट्टेबाजीच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य मंत्रालयानेही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

डिलिव्हरीसाठी प्री-बुकिंग सुरू

आयात केलेल्या चांदीची प्रचंड रक्कम कोठे गेली याचा शोध घेण्याचा मंत्रालय प्रयत्न करीत आहे. कोणी त्याचा मोठ्या प्रमाणात साठा केला आहे का? तज्ज्ञ म्हणाले, ‘मार्केट पॅनिक मोडमध्ये आहे, जे विक्री करत आहेत, ते जास्त किंमती आकारत आहेत, म्हणून आम्ही सहज डिलिव्हरीसाठी प्री-बुकिंग सुरू केले आहे. तज्ज्ञ म्हणतात की”मागणी खूप वाढली आहे. लवकरच परिस्थिती सामान्य होईल. ‘

सोने-चांदीचे दर

दरम्यान, दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 1,000 रुपयांनी वाढून 1,31,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या हंगामात किरकोळ विक्रेते आणि ज्वेलर्सवर मोठा दबाव आहे. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, 99.9 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचे दर 1,30,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले आहेत.

1,82,000 रुपये प्रति किलोवर

स्थानिक सराफा बाजारात 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचे दर 1,000 रुपयांनी वाढून 1,31,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. चांदीचे दर 3,000 रुपयांनी घसरून 1,82,000 रुपये प्रति किलोवर आले. मंगळवारी चांदीचे दर 6,000 रुपयांनी वाढून 1,85,000 रुपये प्रति किलोवर पोहोचले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.