तू नुसता येऊ तर बघ बाबू…, 5 हजार मिसाईल तैनात, या छोट्या देशाची ट्रम्प यांना थेट धमकी
GH News October 24, 2025 07:11 PM

व्हेनेझुएला आणि अमेरिकेमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मादुरो यांनी आता थेट अमेरिकेला इशारा दिला आहे. व्हेनेझुएलाच्या अनेक महत्वाच्या एअर डिफेंस बेसवर पाच हजारांपेक्षा अधिक लढाऊ विमानांचा खात्मा करू शकतात एवढ्या प्रमाणात मिसाईल तैनात असल्याचं मादुरो यांनी म्हटलं आहे. दरम्यान मादुरो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेल्या या इशाऱ्यानंतर आता पुन्हा एकदा जगात एक नवं युद्ध सुरू होऊ शकतं असा अंदाज परराष्ट्र धोरण तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ड्रग्स तस्करीबाबत बोलताना व्हेनेझुएलाला थेट इशारा दिला होता, ड्रग्स तस्करी प्रकरणात आम्ही व्हेनेझुएलावर सैन्य कारवाई करण्याचा विचार करत आहोत, असं अमेरिकेनं म्हटलं होतं, त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीला व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे, आमच्याकडे पाच हजारांपेक्षा जास्त लढाऊ विमानं पाडू शकतील एवढ्या मिसाईल सध्या तैनात असल्याचं मादुरो यांनी म्हटलं आहे. मादुरो यांच्या या इशाऱ्यानंतर आता अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील तणाव आणखी वाढला आहे.

अमेरिकेनं आता ड्रग्स कार्टेलविरोधातील आपली मोहीम अधिक वेगवान केली आहे, ड्रग्स कार्टेलविरोधात अमेरिकेनं कॅरिबियामध्ये जवळपास 4,500 सैनिक तैनात केले आहेत.एवढंच नाही तर अमेरिकेकडून या मोहिमेचा एक भाग म्हणून व्हेनेझुएलामधून निघालेल्या अनेक बोटींवर कॅरिबियन किनाऱ्यांवर हल्ला देखील करण्यात आला आहे, अमेरिकेच्या या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामध्ये ज्यांचा मृत्यू झाला ते निरापराध लोकं होते, मात्र अमेरिकेनं त्यांच्यावर ड्रग्स तस्करीचा आरोप लावला आहे, असा दावा व्हेनेझुएलाकडून करण्यात आला आहे, एवढंच नाही तर व्हेनेझुएलाच्या पराष्ट्रमंत्रालयाकडून पुरावा म्हणून काही छायाचित्र देखील जारी करण्यात आली आहेत, त्यामुळे आता तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, डोनाल्ड ट्रम्प देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.