भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. सलग दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा वनडे सामना हा औपचारिक असणार आहे. या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे. तिसरा वनडे सामना सिडनीत होणार असून भारतीय संघ तिथे पोहोचला आहे. या सामन्यात क्रीडाप्रेमींचं लक्ष हे विराट कोहलीकडे असणार आहे. कारण मागच्या दोन्ही सामन्यात विराट कोहली फेल गेला आहे. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. पर्थ आणि एडिलेड वनडे सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. आता तिसऱ्या वनडे सामन्यातही विराट कोहली शून्यावर बाद झाला तर काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. जर तसं झालं तर दिग्गज क्रिकेटपटूच्या नावावर नकोसा विक्रम रचला जाईल.
सिडनी वनडे सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला तर अशी नकोशी कामगिरी करणारा सहावा भारतीय फलंदाज ठरेल. यापूर्वी सूर्यकुमार यादव, अनिल कुंबले, झहीर खान आणि इशांत शर्मा हे तीन वेळा शून्यावर बाद झाले आहेत. पण भारतीय क्रिकेट इतिहासात कोणताही खेळाडू वनडे मालिकेत सलग तीन वेळा शून्यावर बाद झालेला नाही. जर सिडनी वनडे सामन्यात असं झालं तर विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम रचला जाईल. वनडे सामन्यात सलग तीन वेळा शून्यावर बाद होणाऱ्या यादीत दिग्गज खेळाडू आहेत. यात सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंगसारख्या दिग्ग फलंदाजांचा समावेश आहे. तसेच टॉम लॅथम,लान्स क्लूजनर, सूर्यकुमार यादव आणि शोएब मलिक यांनी वनडेत झिरोची हॅटट्रीक केली आहे.
विराट कोहलीचं सिडनीच्या मैदानाशी 36 चा आकडा आहे. या मैदानात विराट कोहलीचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. त्यामुळे या सामन्यातही शून्यावर बाद होण्याची चिन्ही क्रीडाप्रेमींना दिसत आहेत. विराट कोहलीने 7 वनडे सामन्यात फक्त 146 धावा केल्या आहेत. या धावाही त्याने 25पेक्षा कमी सरासरीने केल्या आहेत. आता विराट कोहली फॉर्मही नाही. सात महिन्यानंतर वनडे मालिका खेळत असून पहिल्या दोन सामन्यात फेल गेला. त्यामुळे त्याच्यावर दबाव असणार यात काही शंका नाही.