विरार : अन्नदाता, बळीराजा शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी करण्यासाठी आज सकाळी जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते आणि वसईतील काही शेतकरी वसईत तहसील कार्यालयाजवळ जमले होते. मागील दोन वर्षांपासून वसईतील शेतकरी व नागरिक नुकसान भरपाई पासून वंचित आहेत.
सतत दोन वर्षे तालुक्यात अतिवृष्टी मुळे शेतकरी व नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. अजून त्यांना भरपाई मिळालेली नाही. याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसने प्रांत अधिकारी कार्यालयावर आंदोलन करत हातात काळे कंदील आणि डोक्याला आणि हाताला काळ्या पट्ट्या लावून राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा निषेध करत काळी दिवाळी साजरी केली.
तत्पूर्वी तहसील कचेरीसमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला त्यानंतर पुढे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यांनातर प्रांत अधिकारी यांची भेट घेऊन महामाहीम राज्यपाल यांना काँग्रेसच्या शिष्ठामंडळाने निवेदन दिले. शेकऱ्यांना व नागरिकांना लवकफत लवकर भरपाई मिळावी यासाठी चर्चा केली.
Virar News:'निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन'; वसई–विरार परिसरातील रस्त्यांच्या अवस्थेबाबत माेर्चायावेळी प्रांत अधिकारी घाडगे यांनी सांगितले कि, आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार असून केव्हायसी करायचे काम प्रगती पथावर आहे. तहसील कार्यालयाकडून सुद्धा लवकरच सर्व याद्या उपलब्ध होतील आणि लवकरच भरपाई देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. वारस तखते करण्यास आम्ही बांधील असल्याचे घाडगे म्हणाले असे ओनील आल्मेडा यांनी माध्यमान्ना सांगितले. यांनातर शेतकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना झूणका भाकर भरवून सरकारचा जाहीर निषेध केला.
महाराष्ट्रात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अन्नदाता, बळीराजा, शेतकरी यांच्या फळ, फुले बागा, शेतात, वाडीत विविध पिके घेणारे बागायतदार यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती व पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. दिवाळी पूर्वीच हाताला आलेली पिकेही नष्ट झाली आहेत. त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यांना राज्य सरकारतर्फे आर्थिक मदत देखील दिवाळी पूर्वी मिळायलाच पाहिजे होती. ती तर मिळाली नाहीच तसेच गतवर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले होते व त्यामुळे त्या बाधित जनतेला त्यातील बऱ्याच लोकांना अजूनही आर्थिक मदत मिळालेली नाही. ती मदत मिळावी यासाठी वसई तालुक्यातील शेतकरी वर्गातर्फे भाजपा केंद्र व राज्य सरकारला वसई प्रांत अधिकारी घाडगे यांच्या मार्फत झुणका, पिठलं, भाकर, काळ्या पणती (दिवे) व काळ्या कंदीलाचे प्रतीक वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आले.
अन्नदाता, बळीराजा, शेतकरी यांच्या तीव्र भावना भाजपा सरकारपर्यंत पोहचवाव्यात अशी विनंती काँग्रेसचे जिल्हा काँग्रेस तर्फे प्रांत अधिकारी यांच्याकडे केली आहे. ह्या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव कॅ. निलेश पेंढारी, प्रवीणा चौधरी, किरण शिंदे, वैलेंटाइन मिरची, मिल्टन सौदिया, रेनॉल्ड लोपीस, शेतकरी नेपोलियन डायस, प्रवीण डायस, स्टॅनी डिकूना, कुलदीप वर्तक, संदीप कनोजिया, रामदास वाघमारे, सुनील यादव,तबारक खान, सोहेल चौधरी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.