पिंपरी, ता. २४ ः मोरवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने देऊबाई कापसे उद्यान सभागृहात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. फ्रेंड्स म्युझिकल ग्रुप चिंचवड महेश शेटे व जया शेटे, प्रशांत ढेकणे व त्यांच्या सहकलाकारांनी जुनी हिंदी व मराठी चित्रपट गीते, भावगीते यांचे श्रवणीय गायन केले. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मंत्रमुग्ध होऊन गायनाचा आनंद लुटला. यावेळी अभिषेक शिंगाडे, प्रशांत नवगुणे, कांबळे उपस्थित होते. त्यांनी फटाके मुक्त दिवाळीबाबत प्रबोधन केले. दिवाळी निमित्ताने घरोघरी होणाऱ्या साफसफाईमध्ये टाकाऊ वस्तू, कपडे निघतात. त्या महापालिकेच्या केंद्रात जमा कराव्यात, अशा सूचना केल्या. विश्वास पेंडसे, सुरेश बावनकर उपस्थित होते. बी. आर. माडगूळकर यांनी प्रास्ताविक केले. कोषाध्यक्ष अरविंद देशपांडे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन उल्हास झिरपे, हनुमंतराव गुब्याड, बी. एम. जाधव, पंडित वाणी यांनी केले.