Solapur: सोलापूर शहरातील १७ रस्त्यांसाठी पाच कोटींचा विशेष निधी मंजूर
esakal October 25, 2025 09:45 PM

Solapur Municipal Projects: शहरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी शासनाने पाच कोटींचा विशेष निधी शहर मध्य मतदारसंघातील १७ रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. शहरातील रस्ते सुधारण्यावर महापालिकेने भर दिला आहे.

दोन महिन्यांपूर्वी शहरासाठी स्वच्छ वायू उपक्रमांतर्गत ४० कोटी रुपये प्राप्त झाले. त्यातील ३५ कोटी निधीतून रस्ते केले जाणार आहेत. आता पुन्हा शहर मध्यमधील १७ रस्त्यांच्या कामासाठी ५ कोटींचा विशेष निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. यामुळे शहरातील धूळमुक्त योजनेला हातभार लागणार आहे.

CSIR UGC NET December 2025: सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढ; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

तीन वर्षांत शहरात १५० कोटी रुपये रस्त्यांवर खर्च केले. या कामांचा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी मोठा गाजावाजा केला. मात्र यंदाच्या पावसाने प्रशासनातील अधिकाऱ्यांसह, मक्तेदार, लोकप्रतिनिधी यांना उघडे पाडले आहे. त्यामुळे निधीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. तसे होताना दिसत नाही.

हे आहेत 17 रस्ते

1. रस्ता इंद्रप्रस्थ फेज 3 चिटाळकर घर ते भोसले घर ते मकसुदे घरापर्यंत 7.30 मीटर

2. आशा नगर घोडके किराणा ते तेलगू शाळा ते उमेश खरात घरापर्यंत रस्ता

3. स्वाती मेकॅनिकल ते काळे घरापर्यंत रस्ता

4. कामगार वसाहत ते पाणी टाकी ते रमेश माटेटी कारखाना ते बिंगो कारखाना पर्यंत रस्ता

5. लक्ष्मीनारायण टॉकीज मागे नंदाल घर ते कामुनी घरापर्यंत रस्ता

Delhi Tourism: दिल्लीकरांसाठी गुड न्यूज! लवकरच यमुना नदीवर क्रूझ सेवा सुरू, जाणून घ्या कोणते सुविधा मिळणार

6. गुरप्पा म्हेत्रे वस्ती येथील अंतर्गत रस्ते

7. वेणुगोपाल नगर येथील वर्षां सोनार समोरील बोळात रस्ता

8.वेणूगोपाल नगर येथील श्री वेणुगोपाल चॅरिटेबल ट्रस्ट, सोलापूर च्या समोर रस्ता

9. लता देवी नगर येथील श्रीनिवास गड्डम घराच्या बाजूला रस्ता

10. एंडके दवाखाना बोळामध्ये रस्ता

11. कैलास क्यातम वोळामध्ये रस्ता

12. मोहिते नगर येथील वईकर घर ते बटणे घर ते जोजारे घर ते टोणपे घर ते शेंडे

13. घरापर्यंत चौकोट रस्ता

14. मोहिते नगर येथील कांचन घर ते देशमुख घरा पर्यंत रस्ता

15. गरिबी हटाव झोपडपट्टी क्र. २ येथील रेणके घरापासून ते पेरणे दूध डेअरी पर्यंत रस्ता

16. शिवानंद किराणा दुकान येथे अंतर्गत रस्ता

17. रामवाडी मशीद परिसरातील अंतर्गत रस्ता

18. यतीमखाना येथे अंतर्गत रस्ता

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.