कोणते मनुके किंवा किशमिश आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात? पिवळे की काळे?
Tv9 Marathi October 25, 2025 09:45 PM

कोणते मनुके किंवा किशमिश आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात? पिवळे की काळे?

सुकामेवा आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे असतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अनेकदा असे ड्रायफ्रुट्स रात्री पाण्यात भिजवून सकाळी तो खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे शरीराला असणारी ऊर्जा मिळते. त्यातीलच एक महत्त्वाचा सुक्यामेव्याचा प्रकार म्हणजे मनुका. मनुका हा एक सुकामेवा आहे जो केवळ चवीलाच चविष्ट नसतो तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील असतात. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो. मनुका सामान्यतः दोन प्रकारात येतात पिवळा आणि काळा. दोन्ही प्रकार त्यांच्या पद्धतीने फायदेशीर आहेत, परंतु दोघांपैकी कोणते मनुके जास्त फायदेशीर असतात हे जाणून घेऊयात.

पिवळे मनुके खाण्याचे फायदे

पिवळा मनुका सोनेरी रंगाचा असतो आणि कोणत्याही रसायनांशिवाय पिकवले जातात. विशेषतः कोरड्या हवामानात. त्यांना किंचित गोड आणि एक फ्रेश चव असते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह भरपूर प्रमाणात असते.

व्हिटॅमिन सीचा स्रोत : पिवळ्या मनुक्यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण लक्षणीय असते. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. ते त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत, कारण ते कोलेजन उत्पादनास मदत करतात, ज्यामुळे त्वचा ताजी आणि चमकदार राहते.

लोहाचे प्रमाण : पिवळ्या मनुक्यांना लोहाचा समृद्ध स्रोत मानले जाते. कारण त्यांच्यात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. जे अशक्तपणाशी लढण्यास मदत करते.

पचन सुधारते : पिवळ्या मनुक्यात चांगल्या प्रमाणात विरघळणारे फायबर असते, जे पचन सुधारते. ते बद्धकोष्ठता दूर करण्यास देखील मदत करतात.

हाडांसाठी फायदेशीर : यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन सारखे खनिजे असतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

काळ्या मनुक्यांचे फायदे:

काळे मनुके सहसा वाळलेल्या द्राक्षांपासून बनवले जातात. त्यांची चव अधिक खोल आणि गोड असते. काळ्या मनुक्यांचे फायदे देखील असंख्य आहेत.

अँटिऑक्सिडंट्स : काळ्या मनुक्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात. यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि त्वचा तरुण आणि टवटवीत राहते.

हृदयाचे आरोग्य : काळ्या मनुकामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, जे हृदयाचे आरोग्य वाढवते. ते रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.

रक्तातील साखर : काळ्या मनुक्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे ते मधुमेहींसाठी एक चांगला पर्याय बनतात.

पिवळ्या आणि काळ्या मनुक्यांची निवड:

आता प्रश्न असा आहे की, कोणत्या प्रकारचे मनुके जास्त फायदेशीर असतात पिवळे की काळे? याचे उत्तर तुमच्या आरोग्याच्या गरजांवर अवलंबून आहे. जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील किंवा लोहाची कमतरता दूर करायची असेल, तर पिवळे मनुके हा एक चांगला पर्याय असू शकतो. जर तुमचे ध्येय हृदयाचे आरोग्य, अँटिऑक्सिडंट पूरक आहार आणि रक्तातील साखर नियंत्रण असेल, तर काळ्या मनुक्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.