Kolhapur Bramhan Samaj : ‘ब्राह्मण समाजातील शेतकऱ्यांच्या जमिनी कूळ कायद्यात गेल्या आहेत. त्या जमिनी परत मिळाव्यात. ब्राह्मण शेतकऱ्यांच्या जमिनींना कायदेशीर संरक्षण मिळावे, यासह विविध मागण्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे राज्य शासनाकडे केल्या आहेत. ब्राह्मण समाज सामाजिक सलोख्यासाठी अधिक जोमाने कार्यरत राहणार आहे’, अशी माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी दिली. महासंघातर्फे दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी ते आज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘देशातील २२ राज्यांत महासंघाच्या शाखा आहेत. ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापनाकरावी, अशी महासंघ व इतर ब्राह्मण संस्थांची मागणी होती. त्यास शासनाने मान्यता दिली असून, महामंडळाचे काम सुरू झाले आहे. कॅप्टन आशीष दामले यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.’ यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष शाम जोशी, जिल्हाध्यक्ष विवेक जोशी, गुरुप्रसाद कुलकर्णी, सोनल भोसेकर उपस्थित होते.
Yellow Rain Kolhapur : काय सांगता! कोल्हापूरच्या कागल परिसरात चक्क पिवळा पाऊस, सोशल मीडियावर Video Viralमहामंडळाचा असा होणार फायदा
‘ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी परशुराम अार्थिक विकास महामंडळ स्थापन झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवन स्थापन व्हावे. तेथे समाजोपयोगी कार्य घडावे यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेवर महामंडळाच्या निधीतून भवन उभारले जाईल’, असे यावेळी आशीष दामले यांनी सांगितले. महामंडळातर्फे समाजातील युवकांना १५ लाखांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज तसेच उद्योग व्यवसाय गटासाठी ५० लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.