00171
आरोंदा ग्रामपंचायतीतर्फे
‘घरकुल’ कामांना प्रारंभ
आरोंदा, ता. २४ ः आरोंदा ग्रामपंचायतीकडून घरकुल योजनेतून मंजूर झालेल्या घरांच्या बांधकामाचा पाडव्याच्या मुहूर्तावर भूमिपूजन करून प्रारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच सायली साळगावकर, उपसरपंच गोविंद केरकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष नाईक, ग्रामपंचायत अधिकारी सतीश राणे, कर्मचारी सुनील जाधव, तसेच घरकुल योजनेचे लाभार्थी उपस्थित होते. या घरकुल योजनेत भीमसेन नाईक, आत्माराम नाईक, दत्तगुरू चोडणकर, आयेशा वेळणेकर, लक्ष्मीबाई मिशाळ, तातोजी नाईक, महादेव सातोस्कर आदी लाभार्थींचा समावेश आहे.