दांडेलीत ३१ ऑक्टोबरला जिल्हास्तर भजन स्पर्धा
esakal October 26, 2025 02:45 AM

दांडेलीत ३१ ऑक्टोबरला
जिल्हास्तर भजन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २४ः श्री देव दाडोबा देवस्थान व ग्रामस्थ मंडळ दांडेली आयोजित भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धा ३१ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडेली (श्री देव दाडोबा देवस्थान प्रवेशद्वार जवळ) आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम १५००० व चषक (श्री मोतिराम कामत दांडेली पुरस्कृत), द्वितीय ११००० व चषक (अंकित धाऊस्कर, ग्रामपंचायत सदस्य न्हावेली पुरस्कृत), तृतीय ७००० व चषक (दशरथ मुळीक कोंडुरा) अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत श्री देवी माऊली भजन मंडळ साटेली (बुवा सत्यनारायण कळंगुटकर), श्री लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ कणकवली (योगेश मेस्त्री), श्री सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ अणसूर वेंगुर्ले (हर्षल मेस्त्री), रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाट पंचक्रोशी (आशिष सडेकर), सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ जानवली (दुर्गेश मिठबावकर), रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ घोडगे (हर्षल ढवळ), श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी (प्रसाद आमडोसकर) आदी संघ सहभागी होणार आहेत.
उत्कृष्ट गायन, झांज वादक, हार्मोनियम, कोरस, पखवाजवादक, तबला वादक, शिस्तबद्ध संघ, उत्कृष्ट गजर यासाठी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सचिन पांगम, ओंकार परब यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री देव दाडोबा देवस्थान व ग्रामस्थ मंडळ दांडेली यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.