सुंदर दिसायला कोणाला नाही आवडणार? त्यासाठी सगळेचजण किती तरी प्रकारे आपल्या चेहऱ्याची, त्वचेची काळजी घेत असतात. त्यात आता कितीतरी महागड्या ट्रिटमेंट निघाल्या आहेत. अनेक मुलींना आता त्यांच्या भुवया जाड ठेवायला आवडतात. भुवया याचेहऱ्याच्या सौंदर्यात आणि भावनेत महत्त्वाची भूमिका बजावतात. जाड, स्पष्ट आणि नीटनेटक्या भुवया तुमच्या चेहऱ्याला एक तेजस्वी लूक देतात आणि तुमचे डोळे आकर्षक बनवतात. त्यामुळे जाड भुवया ठेवण्याचा ट्रेंडही आता फार चर्चेत आहे. त्यासाठी केमिकल अन् महागड्या ट्रिटमेंट घेतात. पण ज्यांना हे पर्याय नाही आवडत ते घरगुती उपायांकडे वळतात. असाच एक घरगुती उपाय आहे जो सध्या फार चर्चेत आहे. तो उपाय म्हणजे व्हॅसलीन.
सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय
व्हॅसलीन हा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. व्हॅसलीनमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत जे भुव्यांच्या मुळांना पोषण देतात आणि नवीन केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. ते वापरणे खूप सोपे आहे आणि घरी करता येते. तर, भुवया वाढवण्यासाठी तुम्ही व्हॅसलीन कसे वापरू शकता ते जाणून घेऊया.
व्हॅसलीन वापरण्याची योग्य पद्धत:
प्रथम, तुमचा चेहरा आणि भुवया पूर्णपणे स्वच्छ करा.
तुमच्या भुवया मेकअप, घाण किंवा तेलापासून मुक्त आहेत याची खात्री करा.
नंतर, थोडेसे व्हॅसलीन घ्या आणि ते तुमच्या भुवयांवर लावून हलक्या हाताने मसाज करा.
ते दिवसातून दोनदा लावा , सकाळी आणि झोपण्यापूर्वी.
रात्री व्हॅसलीन लावणे सर्वात फायदेशीर आहे, कारण झोपेच्या वेळी केसांची वाढ जलद होते.
तुम्ही व्हॅसलीनमध्ये नारळ तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल देखील मिसळू शकता.
हा उपाय नियमित केला तर भुवयांमध्ये लक्षणीय फरक दिसून येईल. काहींना फक्त एका आठवड्यात फरक दिसू शकतो, परंतु योग्य वापराने, परिणाम दीर्घकाळ टिकतात. या काळात भुवया खाजवणे, ओढणे किंवा घासणे टाळा, कारण यामुळे केस कमकुवत होऊ शकतात आणि वाढ रोखली जाऊ शकते.
व्हॅसलीनचे फायदे:
भुवया जाड बनवते.
भुवयांची मुळे मजबूत होतात.
त्वचा हायड्रेटेड राहते, कोरडेपणा किंवा खाज सुटत नाही.
हा एक घरगुती उपाय आहे, सुरक्षित आणि स्वस्त आहे.