Marathi Entertainment News : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या काजळमाया या मालिकेची. अक्षय केळकर आणि वैष्णवी कल्याणकर यांची मुख्य भूमिका असलेल्या काजळमाया या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नुकतीच या मालिकेची कास्टही उघड करण्यात आली.
300 वर्षांपासून आरुषशी लग्न करण्याची वाट पाहत असलेली पर्णिका नावाची चेटकीण. आरुषचं कोणत्याही परिस्थितीत रक्षण करणारी आभा आणि या सगळ्यात कसल्याही संकटाची जाणीव नसलेला आरुष यांची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे. नुकतीच या मालिकेची संपूर्ण कास्ट उघड करण्यात आली.
या आधी या मालिकेत अक्षय आणि वैष्णवीबरोबर रुची जाईल, मोहन जोशी, प्रिया बेर्डे यांच्या मुख्य भूमिका आहेत हे उघड झालं होतं. याबरोबरच या मालिकेत किशोर चौघुले, विघ्नेश जोशी, समीरा गुजर, नीलपरी खानवलकर, अमित डोलावत यांच्याही भूमिका आहेत.
किशोर चौघुले या मालिकेत आप्पा ही भूमिका साकारत आहेत, अमित डोलावत आरुषच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. विघ्नेश जोशी आरुषचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहेत. नीलपरी आसावरी या स्वार्थी बाईची भूमिका साकारणार आहे. याशिवाय काही नवे चेहरेही या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
आता या मालिकेचं कथानक कसं पुढे जाणार हे पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. तेव्हा पाहायला विसरू नका 27 ऑक्टोबरपासून काजळमाया दररोज रात्री 10:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्री अनुजा साठेने मुंबईत घेतलं नवं घर ! शेअर केली नव्या घराची झलक