गाथेच्या शोधात – श्रीशैलमचे स्त्रीराज्य योगिनी महामंडलेश्वरी मल्लाम्बिका
Marathi October 26, 2025 11:25 AM

>> विशाल फुटाणे

दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील करनूल जिह्यातील श्रीशैलम हे स्थान. जिथल्या शिलालेखात ‘महामंडलेश्वरी मल्लाम्बिका देवी’ हिने भ्रमराम्बा मंदिरासाठी भूमिदान दिल्याची नोंद आहे. स्त्राrच्या धार्मिक नेतृत्वाची साक्ष देणारी ही घटना आहे.
योगिनी परंपरेत स्त्री अधिपत्य आणि आध्यात्मिक अधिकार किती महत्त्वाचे होते आणि स्त्रिया केवळ उपास्य नव्हेत, तर साधना आणि शक्तीच्या केंद्रस्थानी होत्या. भारतीय धार्मिक परंपरेचा प्रवास केवळ देवळे, देवता आणि पुराणकथांपुरता मर्यादित नाही, तर त्यामागे एक गूढ आणि सजीव तत्त्वज्ञान आहे जिथे देवीला अधिष्ठात्री आणि पुरुष देवाला तिचा सहचर मानले जाते. “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’’ या वचनातच या परंपरेचे मूळ लपलेले आहे. या तत्त्वाचा सर्वोच्च अविष्कार जिथे दिसतो ते स्थान म्हणजे दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील करनूल जिह्यातील श्रीशैलम हे स्थान. श्रीशैलम नल्लमाला पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले ते पवित्र तीर्थ, जिथे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि भ्रमराम्बा शक्तिपीठ यांचा मिलाफ घडतो. श्रीशैल पर्वत हा केवळ एक तीर्थस्थान नाही, तर स्त्रीशक्तीचा सजीव शिखर आहे. या पर्वतावर उभे असलेले मंदिर, त्यातील शिल्प आणि आख्यायिका सर्वत्र एक विलक्षण गूढता आणि स्त्राrप्रधानतेचा सुगंध जाणवतो. येथे शिव आणि शक्तीचा संगम हा केवळ दैवी संयोग नाही तर एक आध्यात्मिक उलथापालथ आहे जिथे देवी सर्वोच्च आणि शिव तिच्या अधीन ठरतो. श्रीशैल पर्वताचा उल्लेख स्कंद, लिंग आणि कूर्मपुराणांत देवीच्या अधिष्ठान म्हणून सापडतो; पुढे काकतीय काळात या स्थळाने धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे रूप घेतले. Epigraphia indica मधील एका शिलालेखात “महामंडलेश्वरी मल्लाम्बिका देवी’’ हिने भ्रमराम्बा मंदिरासाठी भूमिदान दिल्याची नोंद आहे ही घटना केवळ भक्तीची नव्हे तर स्त्रीच्या धार्मिक नेतृत्वाची साक्ष आहे. त्या काळी श्रीशैलममध्ये स्त्रिया मंदिर प्रशासन, अन्नदान आणि तपस्वींच्या सेवेत सक्रिय होत्या. अर्थातच ही होती एका मातृसत्ताक धार्मिक व्यवस्थेची झलक. जिच्यात स्त्राr ही केवळ उपास्य नव्हे तर धर्मसंरक्षिका होती.

श्रीशैलम तांत्रिक साधनेचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. कौलमार्ग, कुलार्णव तंत्र आणि त्रिपुरासंप्रदाय यांत त्याचा उल्लेख अष्टादश योगिनीपीठांपैकी एक असा सापडतो. येथे भ्रमराम्बा देवी “भ्रमररूपेण असुरसंहारिणी’’ म्हणून पूजली जाते-ती क्रियाशील, नियंत्रणशील आणि अधिपत्यशाली शक्तीचे प्रतीक आहे. विद्या देहेजिया यांनी लिहिले आहे की, ‘श्रीशैलम् हे स्त्राrशक्तीच्या तांत्रिक संकल्पनेचे आणि योगिनींच्या विधिवत सार्वभौमतेचे प्रतीक आहे.’ या योगिनी परंपरेत स्त्री ही तांत्रिक शक्तिचक्राची अधिष्ठात्री असून पुरुष देव हे तिच्या सहकार्याने कार्य करतात. हेच ‘स्त्राrराज्य’ या संकल्पनेचे मूळ तत्त्व आहे. मंदिराच्या भिंतींवर कोरलेली शिल्पे केवळ धार्मिक न राहता जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्त्राrची उपस्थिती दर्शवतात. या शिल्पांमध्ये स्त्रिया केवळ पूजक किंवा नर्तकी नाहीत; त्या रणभूमीवर शस्त्रs हातात घेताना, रथ हाकताना, शिकारीसाठी निघताना, शेती करताना आणि राज्य कारभारात सहभागी होताना दिसतात. या दृश्यांमधून एक वेगळेच समाजचित्र उभे राहते, जिथे स्त्राr केवळ गृहिणी नव्हती, तर समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात निर्णायक भूमिका बजावत होती. असे वाटते की, श्रीशैल पर्वतावर एकेकाळी खरोखरच ‘स्त्रीराज्य’ फुलले होते. हेच कदाचित त्या योगिनींचे साम्राज्य होते, ज्यांनी आपल्या शक्तीने आणि साधनेने संपूर्ण पर्वताला अध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र बनवले.

स्थानिक परंपरेनुसार, मल्लिकार्जुन लिंग हे भ्रमराम्बा देवीच्या आज्ञेने येथे स्थिर झाले. म्हणजेच येथे शिव हे देवीच्या इच्छेनुसार अधिष्ठित झालेले दैवत आहे. म्हणजेच संपूर्ण धार्मिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू होता स्त्राr देवी. या मातृसत्ताक संरचनेत शक्ती ही केवळ सृजनशक्ती नव्हती, तर ती होती नियंत्रण आणि संरक्षण यांचे अद्वितीय संतुलन. त्या काळात मंदिराचे प्रशासन आणि धार्मिक विधी या दोन्हींत ठळक मातृसत्ताक प्रभावी होत्या. अशा समाजव्यवस्थेत पुरुष हा सहकारी होता, अधिपती नव्हे. आणि देवी आदिशक्ति हीच सृष्टी, पालन आणि संहार या तिन्ही कार्यांची नियंता होती.

शिलालेखीय साक्षी याला पुष्टी देतात. Epigraphia indica मध्ये श्रीशैलमच्या महिला दानकर्त्यांचे उल्लेख, भूमिदान, अन्नदान आणि मंदिर व्यवस्थापनातील त्यांचा सहभाग याचे नोंद आहेत. याशिवाय योगिनी परंपरेशी निगडित देवदासी संस्थांचे अवशेष, आणि श्रीशैल महात्म्यात देवी भ्रमराम्बेचे अधिपत्य यांचा स्पष्ट उल्लेख या स्त्राrप्रधान व्यवस्थेची ऐतिहासिक सत्यता अधोरेखित करतो. श्रीशैल पर्वतावर एक अद्भुत स्त्रीप्रधान अधिष्ठान होते जिथे देवी आणि योगिनींच्या अधिपत्याखाली संपूर्ण धार्मिक व्यवस्था चालायची. अशीही अख्यायिका सांगितली जाते की, मच्छिंद्रनाथ हे श्रीशैल पर्वतावरील योगिनींच्या मोहमायाजाळात अडकले होते. तेव्हा त्यांचा शिष्य गोरखनाथ यांनी तत्त्वज्ञान आणि योगशक्तीच्या मार्गाने त्यांना त्या मोहजाळातून मुक्त केले. त्याच योगपरंपरेत मच्छिंद्रनाथांची शिष्या मुक्ताई नावाची योगिनी होती. त्या मुक्ताई योगिनीसमवेत श्रीशैल पर्वतावर योगसाधनेत रमलेली होती. या घटना स्पष्ट करतात की योगिनी परंपरेत स्त्राr अधिपत्य आणि आध्यात्मिक अधिकार महत्त्वाचे होते आणि स्त्रिया केवळ उपास्य नव्हेत, तर साधना व शक्तीच्या केंद्रस्थानी होत्या.

या सर्वातून एक वेगळे चित्र उभे राहते, जिथे धर्माचा केंद्रबिंदू ही स्त्राr आहे, जिथे तांत्रिक साधना, सामाजिक भूमिका आणि धार्मिक सत्ता या सर्वांचा संगम एका मातृसत्ताक अधिष्ठानात होतो. श्रीशैलम हे अशा स्त्राrप्रधान तांत्रिक परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. श्रीशैलम येथील हे संदर्भ म्हणजे स्त्राr ही भक्त नव्हे तर राज्यकर्ती आहे. ती साधक आहे, सर्जक आहे आणि संपूर्ण विश्वाच्या अधिष्ठानाची प्रतीक आहे. म्हणूनच श्रीशैलम हे दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन आणि तेजस्वी स्त्राrराज्याचे प्रतीक ठरते. जिथे देवीच आहे धर्म, सत्ता आणि सत्य. याच श्रीशैलम येथे आद्य गुरु शंकराचार्य यांनी श्रीयंत्र स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान येथील भव्य उत्तर गोपूराची निर्मिती केल़ी
(लेखक इतिहास व पुरातत्व संशोधक आहेत.)
[email protected]

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.