Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्रातला तो खासदार कोण? अंबादास दानवेंचा मोठा गौप्यस्फोट
Saam TV October 26, 2025 02:45 PM
  • फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.

  • डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अंबादास दानवे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलंय.

  • या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे.

फलटणमधील महिला डॉक्टरवर दबाव टाकणारा खासदार आणि त्यांचे पीए कोण? यासंदर्भात ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. मात्र दानवेंनी कोणत्या माजी खासदाराचं नाव उघड केलंय आणि त्यावरुन कसं राजकारण तापलंय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

फलटणमधील महिला डॉक्टरच्याआत्महत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय. महिला डॉक्टरचा तक्रार अर्ज ते चौकशी समितीसमोरील खुलासा. या सगळ्या पत्रात वारंवार उल्लेख करण्यात आलेल्या खासदार आणि त्यांच्या पीएसंदर्भात ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यांनी थेटपणे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेत त्यांच्या अटकेची मागणी केलीय.

'प्रशांत अन् डॉक्टर तरूणीचे संबंध' Whatsapp Chatsमधून पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती

दुसरीकडे रामराजे नाईक निंबाळकरांनी मात्र या प्रकरणी सीडीआर काढल्यास प्रकरणाचा छडा लागेल म्हणत सूचक वक्तव्य केलंय. आता आरोपांच्या घेऱ्यात सापडलेले भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत. एवढंच नाही तर या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणीही रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलीय.

Satara Crime : 'दादा' म्हणायची, त्याला प्रपोजही केलं, महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणात आरोपी बनकरच्या बहिणीचा धक्कादायक दावा

खरं तर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने छळामुळे हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली..या सुसाईड नोटमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख होता.. तर चौकशी समितीसमोर केलेल्या खुलाशात खासदार आणि त्यांच्या 2 पीएचा उल्लेख समोर आलाय.. त्यात आता दानवेंनी थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतल्यानं या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दूध का दूध आणि पानी का पानी करण्याची गरज आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.