Manoj Bajpayee : "फोटो खिंचवाने थोडी आये है..."; मनोज बाजपेयी पापाराझींवर संतापले, पाहा VIDEO
Saam TV October 26, 2025 03:45 PM

मनोज बाजपेयी हे आपल्या दमदार वेब सीरिजसाठी ओळखले जातात.

सध्या मनोज बाजपेयी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत मनोज बाजपेयी पापाराझींवर भडकताना दिसत आहेत.

प्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयी कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी आजवर आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अलिकडेच त्यांचा जुगनुमा (jugnuma) चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या मनोज बाजपेयी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ते पापाराझींवर भडकताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांना पापाराझींनी एअरपोर्टवर स्पॉट केले. तेव्हा त्यांचे फोटो काढण्यासाठी पापाराझी पुढे आले. तेव्हा मनोज बाजपेयी चिडून म्हणतात की, "पागल है क्या? फोटो खिंचवाने थोडी आये है..." असे बोलून त्यांनी कॅमेराबंद करण्याचा इशारा केला. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पांढऱ्या रंगाच्या शर्ट-पॅन्टमध्ये मनोज बाजपेयी एअरपोर्टवर स्पॉट झाले. त्यांच्या शर्टवर फ्लोरल प्रिंट पाहायला मिळाली. डोळ्याला काळा गॉगल लावून डॅशिंग लूकमध्ये ते एअरपोर्टवर स्पॉट झाले. कलाकारांचे पापाराझींवरचिडताना, भडकतानाचे व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. कधी कधी कलाकारांचा संयम तुटतो तेव्हा ते असे रिएक्ट करून जातात.

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

मनोज बाजपेयी यांनी आजवर अनेक हिट चित्रपट आणि वेब सीरिज केल्या आहेत. 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजच्या माध्यमातून मनोज बाजपेयीने प्रेक्षकांच्या मनात घर केले. मनोज बाजपेयी आता लवकरच पुन्हा एकदा 'फॅमिली मॅन ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bigg Boss 19 : "लाइन मत क्रॉस करणा..." सलमान खानने फरहाना भट्टला दिली शेवटची वॉर्निंग, पाहा VIDEO
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.