आर्य चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी मानवी जीवनाशी संबंधित अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात मानवाचं जीवन हे दु:ख आणि कष्टानं भरलेलं आहे, तुमच्या वाट्याला अनेक दु:ख येतात, परंतु ते तुम्हाला पचवता आले पाहिजे, त्यातून पुढचा मार्ग काढता आला पाहिजे, यातच मानवी जीवनाचं सार्थक आहे. चाणक्य म्हणतात संघर्षाशिवाय या जगात कोणतीही वस्तू मिळत नाही, तुम्हाला जर एखादं ध्येय पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मोठा संघर्ष करावा लागेल. मात्र अशा काही गोष्टी आहेत, त्या जर तुम्ही तुमच्या मानालाच विचारल्या तर तुमच्या वाट्याला येणाऱ्या दु:खाची तीव्रता कमी होईल आणि संघर्ष देखील अधिक सोपा होईल, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे.
हे कोणतं वर्ष सुरू आहे – चाणक्य म्हणतात तुम्ही तुमच्या मनाला हा प्रश्न नेहमी विचारला पाहिजे की हे कोणतं वर्ष सुरू आहे? त्यामुळे तुम्हाला वेळेचा अचूनक अंदाज येतो. आयुष्यात ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत, त्याचा प्राधान्यक्रम ठरवता येतो.
आपला मित्र कोण, शत्रू कोण? चाणक्य म्हणतात तुम्ही हा प्रश्न तुमच्या मनाला नेहमी विचारला पाहिजे की, तुमचा खरा मित्र कोण आहे आणि कोण शत्रू आहे? यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूपासून कायम सावध राहालं. त्यामुळे तुमची कधीही फसवणूक होणार नाही. तसेच गरजेच्या वेळी मित्राची देखील मदत मिळेल.
तुम्ही जिथे राहता ते स्थान तुमच्यासाठी योग्य आहे का? – चाणक्य म्हणतात तुम्ही जिथे राहता ते स्थान तुमच्यासाठी योग्य आहे का? तिथे तुम्हाला प्रगतीची संधी उपलब्ध होणार आहे का? तुम्हाला रोजगार मिळणार आहे का? हे प्रश्न स्वत:ला विचारा. जर या सर्व प्रश्नाची उत्तर होय असतील तरच त्या जागी वास्तव्य करा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
आपलं उत्पन्न किती – चाणक्य म्हणतात व्यक्तीने नेहमी आपलं उत्पन्न किती आहे, आणि त्यात माझ्या गरजा मी भागू शकतो का? जर गरजा पूर्ण होत नसतील तर मी माझं उत्पन्न कोणत्या पद्धतीनं वाढू शकतो याचा आवश्य विचार करावा.
मी कोण आहे- चाणक्य म्हणतात हा तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, जो माणसानं दिवसातून एकदा तरी स्वत:ला विचारलाच पाहिजेत, यातूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पुढची दिशा मिळण्यास मदत होते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)