Tilari Forest Crime : महामार्गालगत साळिस्ते येथे सापडलेला मृतदेह श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बंगळुरू) यांचा असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. तसेच, तिलारी येथे सापडलेली मोटारदेखील त्यांचीच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. रेड्डी पेशाने डॉक्टर होते. ते आंध्र प्रदेश येथे कार्यरत असल्याची नवी बाब तपासात समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा खून आर्थिक कारणातून किंवा अन्य काही कारणांनी झाला असावा, या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रेड्डी यांच्या छातीवर, पोटात वार करून खून करण्यात आला.
त्यानंतर त्यांचा चेहरा विद्रुप करून मृतदेह महामार्गालगत साळिस्ते येथे टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बंगळुरू शहरात रहिवासी असलेले डॉ. रेड्डी यांच्या कुटुंबीयांकडून अधिक माहिती घेण्यासाठी कणकवली आणि स्थानिक गुन्हा अन्वेषणचे एक पथक शुक्रवारी (ता. २४) बंगळुरू येथे रवाना झाले होते. मात्र, पथक अद्याप कणकवलीत दाखल झालेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासाची पुढील दिशा समजू शकलेली नाही.
रेड्डी यांचा मृतदेह गुरुवारी (ता. २३) साळिस्ते येथे आढळून आला होता, तर त्यांची मोटार त्याच दिवशी तिलारी येथील दरीत आढळून आली होती. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच, मंगळवारी (ता. २१) त्यांचा खून करून मृतदेह साळिस्ते येथे टाकण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाले आहे.
या खुनाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि कणकवली पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाकडून साळिस्ते येथे कोणत्या वाहनातून मृतदेह आणण्यात आला, या घटनेत किती आरोपींचा सहभाग आहे.
Kolhapur Brain Stroke Case : व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी २३ वर्षीय विशालला ब्रेन स्ट्रोक; क्षणात संपलं सगळं, कोल्हापुरातील घटनेनं सर्वत्र हळहळतसेच तिलारी नवीन वसाहत लगतच्या दरीत मोटार दरीत टाकून देण्याच्या घटनेत किती आरोपींचा सहभाग आहे, याचा तपास या पथकांकडून केला जात आहे. त्याअनुषंगाने तिलारी ते साळिस्ते या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. बंगळूर येथून मृताचे नातेवाईक कणकवलीत आल्यानंतर तपासाला गती येणार आहे. सध्यातरी या प्रकरणाच्या तपासात फारसे काही निष्पन्न झाले नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली.