अजय सोनवणे
नाशिक : येवल्यातील अपघातांचा सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. महिन्याभरात रस्त्या अपघातामध्ये चार ते पाच जणांचे बळी गेले असून आज सकाळी पुन्हा एकाचा पादचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. सकाळी एक इसम रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक देत त्याला उडविले. यात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती.
नाशिकच्या येवला शहरातील विंचूर चौफुली या ठिकाणी विस्कटलेल्या वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक बळी गेला आहे. सकाळी झालेल्या अपघातात राजन नारायण मिस्किन असं अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रस्ता ओलांडत असताना मालवाहू ट्रकने या व्यक्तीला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
Bhandara Rain : भंडाऱ्यात पावसाने झोडपले; धानाला कोंब फुटण्याची भीतीबायपास मार्गाची मागणी
दरम्यान येवला येथे मागील महिनाभरापासून अपघाताचे सत्र सुरु असून यात आतापर्यंत चार ते पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात आजच्या अपघाताची भर पडली आहे. यामुळे प्रशासन आणखी किती बळी जाण्याचे वाट पाहत असून शहराला लवकरात लवकर बायपास व्यवस्था करावी; अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Shegaon Crime : आठवडे बाजाराच्या गर्दीत गाठत युवकाची हत्या; खळबळजनक घटनेने शेगाव हादरलेभरधाव कार दुकानात शिरली
नांदेड : नांदेड शहरातील काबरा नगर ते पावडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधावकार दुकानात शिरली. हा अपघात रात्री अडीच वाजताच्या सुमारास झाला आहे. कारमध्ये तिघे जण होते. कार चालक दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन्हीही दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही.