जर तुम्ही घरी आरामात बसले असाल आणि अचानक कळलं की तुम्ही अब्जाधीश झाले आहात, तर हे एखाद्या स्वप्नासारखंच वाटेल. पण संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये राहणाऱ्या एका भारतीय व्यक्तीचे हे स्वप्न खरं झालं आहे. भारतीय वंशाच्या अनिलकुमार बोला नावाच्या या व्यक्तीचे नशीब एका रात्रीत पलटले आहे. तो एका फोन कॉलनंतर अब्जाधीश झाला आहे. आता नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया…
२९ वर्षीय अनिलकुमार बोला गेल्या कित्येक वर्षांपासून अबू धाबीमध्ये राहत आहे. त्याने UAE च्या लकी डे ड्रॉ लॉटरीत १०० मिलियन धीरहम (सुमारे २४० कोटी रुपये)चा ऐतिहासिक जॅकपॉट जिंकला आहे. हे आतापर्यंतचे UAEचे सर्वात मोठे बक्षीस रक्कम असल्याचे सांगितली जात आहे. लॉटरी आयोजकांनी अधिकृतपणे अनिलकुमारला या ड्रॉचा विजेता घोषित केलं. त्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे.
वाचा: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच पुरावे… डॉक्टर महिला प्रकरणात कुटुंबीयांचा सर्वांत खळबळजनक दावा
लॉटरी टीमकडून आलेला फोन
खलीज टाइम्सच्या अहवालानुसार, हा लकी ड्रॉ शनिवार, १८ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. ड्रॉच्या वेळी अनिलकुमार घरी आराम करत होते, तेव्हाच त्यांना UAE लॉटरी टीमकडून फोन आला. सुरुवातीला त्यांना विश्वासच बसला नाही की ते इतक्या मोठ्या बक्षिसाचे विजेते बनले आहेत.
लॉटरी जिंकल्यानंतर अनिलकुमारने काय सांगितलं?
अनिलकुमारने माध्यमांशी बोलताना सांगितलं, “जेव्हा मला कॉल आला तेव्हा वाटलं कोणी तरी थट्टा करत आहे. मी त्यांना बातमी अनेकदा सांगायला सांगितली. जेव्हा सत्य समजलं तेव्हा मी शब्दांत व्यक्त करू शकलो नाही. हा विजय माझ्या स्वप्नांपलीकडचा आहे. आता तरी विश्वास ठेवणं कठीण जातंय की हे सगळं माझ्यासोबत घडलं आहे.”
भारताचा रहिवासी आहे अनिलकुमार
अनिलकुमार मूळचा भारताचा रहिवासी आहे आणि अनेक वर्षांपासून अबू धाबीमध्ये राहून काम करत आहे. तो नेहमी लॉटरी तिकीट घेत असत, पण कधीही विचार केला नव्हता की इतकी मोठी रक्कम जिंकेल. त्याने सांगितलं की ही रक्कम तो आपल्या कुटुंबाच्या भविष्याची सुरक्षितता करण्यासाठी आणि समाजातील गरजू लोकांची मदत करण्यासाठी वापरणार आहे. UAE मध्ये लॉटरी प्रणाली खूप लोकप्रिय आहे. तिथे दरवर्षी हजारो प्रवासी आपले नशिब आजमावतात, पण अनिलकुमारच्या या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की कधीकधी नशिब एका क्षणात आयुष्य बदलून टाकतं.