Zudio Sale : झुडीओमध्ये 'या' तारखेपासून लागणार सर्वात स्वस्त कपड्यांचा सेल; आजवर आली नाही अशी डिस्काउंट ऑफर, पाहा एका क्लिकवर
esakal October 29, 2025 09:45 AM

Zudio Offers : शॉपिंगच्या प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.. झुडीओ (Zudio) या ट्रेंडी आणि बजेट फ्रेंडली फॅशन ब्रँडने ऑक्टोबरच्या शेवटी एका अविस्मरणीय सेलची घोषणा केली आहे. या 'झुडीओ मेगा ब्लॅक फ्रायडे ब्लिट्झ' (Zudio Black Friday Sale) सेलमध्ये कपड्यांवर ७०% ते ९०% पर्यंतची सूट मिळणार आहे. ही ऑफर इतकी जबरदस्त आहे की, आजवर कधीच आली नाहीये.. पुरुष, महिला, मुलांपासून ते एक्सेसरीजपर्यंत सर्व काही अर्ध्याहूनही कमी किंमतीत मिळेल. एका क्लिकवर झुडीओच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाइटवर) तुम्ही हे सर्व घरी बसून खरेदी करू शकता.

सेलची तारीख जवळ येत असताना, लाखो ग्राहक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. झुडीओ ट्रेंडसेटर रिटेलचे (ट्रेंट लिमिटेड) लोकप्रिय ब्रँड, नेहमीच युवा पिढीला आकर्षित करणाऱ्या स्टायलिश आणि परवडणाऱ्या कपड्यांसाठी ओळखले जाते. या सेलमध्ये वुमन्स वेअर विभागात कुर्त्या, साड्या, जीन्स आणि टॉप्सवर ८०% पर्यंत सूट मिळेल. मेनसेक्शनमध्ये शर्ट्स, ट्राउझर्स आणि स्वेटर्सवर ७५% सूट, तर किड्स कलेक्शनमध्ये कार्टून्स प्रिंटेड टीशर्ट्स ५० रुपयांपासून सुरू. एक्सेसरीजमध्ये हँडबॅग्स, बेल्ट्स आणि ज्वेलरीवर ९०% पर्यंतची भन्नाट ऑफर आहे.

ChatGPT Go Free : फ्री! फ्री! फ्री! ChatGPT Go फ्री..भारतीयांसाठी 'या' तारखेपासून स्पेशल ऑफर सुरू; वर्षभर कसं वापारायचं? पाहाच

विशेष म्हणजे दीपावली आणि ख्रिसमस सीझनसाठी खास एथनिक आणि पार्टी वेअर कलेक्शनवर अतिरिक्त २०% फ्लॅट डिस्काउंट मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित स्टॉकसाठीच आहे..या सेलची खासियत म्हणजे त्यातील अनोख्या डील्स. बाय वन गेट टू फ्री स्किममध्ये तीन टीशर्ट्स फक्त एकच्या किंमतीत मिळतील. बँक ऑफरही जबरदस्त आहे.. HDFC, ICICI आणि Axis कार्डधारकांना १०% इन्स्टंट डिस्काउंट आणि EMI ऑप्शन आहे. झुडीओच्या ५०० हून अधिक स्टोअर्समध्येही ही सेल सुरू होईल, पण ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून एका क्लिकने घरबसल्या शॉपिंगचा आनंद घेऊ शकता.

Crime News : भारतीयांनो परत जा म्हणत भारतीय महिलेवर अत्याचार; 'या' देशात घडलेल्या घटनेने जग हादरले, हल्लेखोर थेट घरात घुसले अन्…

कंपनीने सांगितले की, ही सेल पर्यावरणस्नेही पॅकेजिंगसह सुरू होईल ज्यामुळे शॉपर्सना ग्रीन शॉपिंगचा अनुभव मिळेल. मागील सेलमध्ये १० लाखांहून अधिक आयटम्स विकल्या गेल्या होत्या आणि यावेळी अपेक्षा २०% जास्त आहे. मार्केट एक्स्पर्टच्या मते, ही सेल ई-कॉमर्समध्ये नवीन रेकॉर्ड निर्माण करेल. जर तुम्ही वॉर्डरोब अपडेट करण्याच्या विचारात असाल तर झुडीओच्या 'ब्लॅक फ्रायडे सेल'मध्ये नक्की खरेदी करा. कारण स्टायलिश दिसण्यासाठी आणि पैसे वाचवण्यासाठी एकदम परफेक्ट टाइम आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.