मेलबर्न टी20 सामन्यातील पराभवासाठी कोण जबाबदार? सूर्यकुमारने स्पष्ट करत सांगितला पुढचा प्लान
GH News October 31, 2025 10:12 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसर्‍या टी20 सामन्यात भारताने निराशाजनक कामगिरी केली. भारताला या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून पराभूत केलं. या विजयानंतर मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिला सांमना पावसामुळे ड्रॉ झाल्यानंतर प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. आता तिसऱ्या सामन्यात भारताची कसोटी लागणार आहे. पण दुसर्‍या टी20 सामन्यात भारताची सुमार फलंदाजी कारणीभूत ठरली. पॉवर प्लेच्या सहा षटकात भारताने 4 विकेट गमावल्या होत्या. तसेच भारतीय संघ पूर्ण 20 षटकंही खेळू शकले नाहीत. भारताची डाव 18.4 षटकात 125 धावांवर आटोपला. या सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या मत व्यक्त केलं आहे. या पराभवासाठी त्याने सुमार फलंदाजीला कारणीभूत धरलं आहे.

सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी20 सामना गमावल्यानंतर दिलेल्या वक्तव्यात सांगितलं की, जोश हेझलवूडने चांगली गोलंदाजी केली. त्यात पॉवर प्लेमध्ये तुम्ही चार विकेट गमावल्या. त्यामुळे पुनरागमन करणं खूपच कठीण होतं. याचं पूर्ण श्रेय हे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना जातं. अभिषेक शर्माने या सामन्यात चांगली फलंदाजी केली आणि मागच्या काही सामन्यात तो तसंच करत आला आहे. अभिषेक त्याचा खेळ चांगल्या प्रकारे जाणतो. चांगली गोष्ट अशी आहे की तो यात काहीच बदल करत नाही. आम्हाला आशा आहे की पुढेही तो असाच खेळत राहील. त्यात आम्हाला पुढे जाऊन अशी खेळी पाहायला मिळेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी20 सामना 2 नोव्हेंबरला होबार्ट मैदानात होणार आहे. हा सामना भारताला काहीही करून जिंकावाच लागणार आहे. कारण हा सामना जिंकला तर मालिका विजयाचं स्वप्न पूर्ण करू शकतील. अन्यथा मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी धडपड करावी लागेल. तिसऱ्या टी20 मालिकेसाठी फार काही वेळ नाही. याबाबत सूर्यकुमार यादवला विचारलं गेलं. तेव्हा त्याने सांगितलं की, जर आम्ही त्या सामन्यात पहिली फलंदाजी करत असू तर पहिल्या सामन्यासारखी चांगली फलंदाजी करावी लागेल. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारता येईल. त्यामुळे गोलंदाजांना चांगला स्पेल टाकण्यास मदत होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.