वंदना हिरामण आल्हाट (प्रभाग क्र.३)
सर्वसमावेशक दृष्टिकोनाच्या ‘ताईसाहेब’
इंट्रो
मोशी परिसरातील प्रत्येक नागरिकासाठी कुटुंबातील सदस्य आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मायेने आधार देणाऱ्या एखाद्या मोठी बहिणीप्रमाणे वंदना हिरामण आल्हाट यांनी नेहमीच सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवला आहे. लोकसंवाद, जिव्हाळा आणि प्रत्यक्ष कृती यामुळे त्या सर्वांच्या ‘ताईसाहेब’ बनल्या आहेत. मोशीतील प्रत्येक नागरिकासाठी विश्वासाचे प्रतीक झाल्या आहेत. सेवा, संवेदनशीलता आणि समर्पण हीच खरी लोकनेत्याची ओळख असते. त्याला अनुसरुनच मोशी, डुडुळगाव, चऱ्होली समाविष्ट सर्व भागांचा प्रभाग क्रमांक ३ हा आदर्श प्रभाग करण्याचा मानस ठेवून वंदनाताईंचे कार्य अविरतपणे सुरू आहे.
----------------------------
राजकारणात किंवा समाजकार्यात खऱ्या आणि प्रगल्भ नेतृत्वाची ओळख म्हणजे कार्यकर्त्यांचा सन्मान आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेणे. वंदनाताई आल्हाट या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतात. छोट्या छोट्या समस्यांपासून ते सामाजिक प्रश्नांपर्यंत त्या थेट संवाद साधतात. कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक अडचणी वेळोवेळी सोडवून त्यांनी एखाद्या ताईप्रमाणेच त्यांना खंबीर साथ आणि दिलासा दिला आहे. आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित मदत तातडीने उपलब्ध करून दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सोडविण्यासाठी त्या नेहमीच तळमळीने काम करत आहेत. त्यामुळे, त्यांचे कार्यालय हे फक्त राजकीय कार्यालय नसून जनतेचे घर आणि त्यांच्या समस्या सोडविणारे हक्काचे ठिकाण म्हणून ओळखले जात आहे.
श्रद्धा अन् सेवाभाव
मोशीतील इंद्रायणी नदीघाट परिसर धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक बनला. उत्तर भारतीय बांधवांमार्फत आयोजित छटपूजेच्या निमित्ताने वंदनाताई आल्हाट सकाळी सहा वाजता घाटावर उपस्थित राहिल्या. त्यांनी छठ मय्यैचा आशीर्वाद घेतला आणि श्रद्धाळू बांधवांना शुभेच्छा दिल्या. व्रतस्थ महिलांनी नदीपात्रात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केले. मंगळवारी उगवत्या सूर्याची आरती करून पूजेचा समारोप झाला. या प्रसंगी अयोध्येतील हनुमानगढीचे पुजारी (बाबा) यांच्या हस्ते उपस्थितांना आशीर्वाद मिळाला.
धर्म, संस्कृती आणि एकता ही आपल्या समाजाची खरी ओळख आहे. मोशीमध्ये सर्व धर्म, जाती आणि प्रांत एकत्र साजरे होणारे हे उत्सव आपल्याला बांधून ठेवतात, असे उद्गार वंदनाताई यांनी यावेळी उत्तर भारतीय बांधवांशी बोलताना काढले. त्या शब्दांमधून दिसणारा आत्मीय भाव म्हणजे त्यांचे खरे नेतृत्व. अशाच श्रद्धेने आणि सेवाभावाने नेहमी त्या नेहमी सर्वसामान्य समाजघटकांशी जोडल्या जात असतात.
लोककल्याणाची धडपड
लोकशाही दिनानिमित्त महसूल विभागाच्यावतीने मोशीतील नागेश्वर महाराज मंदिर येथे शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ऑनलाइन शिधापत्रिका, निराधार योजना, आधार कार्ड अद्ययावत सेवा, सेवानिवृत्ती वेतन व इतर कल्याणकारी योजना अशा अनेक उपक्रमांचा लाभ नागरिकांनी घेतला. वंदना आल्हाट यांनी या उपक्रमास भेट देत नागरिकांना मार्गदर्शन केले आणि उपस्थित अधिकाऱ्यांचे कौतुक केले. शासकीय योजना नागरिकांच्या दारात पोहोचल्या पाहिजेत. योजना जनतेपर्यंत पोहोचविणे ही खरी लोकसेवा आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीचेही त्यांनी कौतुक केले. तसेच मोशी परिसरात अशा सामाजिक जनसेवाविषयक उपक्रमांना अधिक गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सामाजिक क्षेत्रातील सक्रिय
मोशी, डुडुळगाव, बोऱ्हाडेवाडी परिसरात वंदनाताई सतत विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय असल्याच्या दिसतात. स्वच्छता मोहिमांपासून वृक्षारोपण, महिलांसाठी
स्वावलंबन कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी सन्मान समारंभ आणि धार्मिक सणांच्या निमित्ताने एकतेचा संदेश देणारे कार्यक्रमांना त्या आवर्जून हजर असतात.
अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्था-संघटनांना त्या पाठबळ देत असतात. समाजातील प्रत्येक घटकाला सहभागी करून त्याचा आणि परिसराचा सर्वसमावेशक विकासाचा प्रवास घडवणे, हे त्यांचे एकच उद्दिष्ट्य राहिले आहे.
महिलांसाठी प्रेरणादायी कार्य
वंदनाताई यांचा महिलांच्या आत्मनिर्भरतेवर विशेष भर असतो. महिलांना फक्त साहाय्याची नाही; तर संधीची गरज असल्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे, त्यांच्या पुढाकाराने मोशी परिसरात महिला बचत गट, हस्तकला प्रशिक्षण, आरोग्य शिबिरे आणि उद्यमशीलतेविषयी मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. त्यामधून अनेक महिला छोट्या व्यवसायांद्वारे आर्थिक स्वावलंबी झाल्या आहेत. त्यांचे हे कार्य महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.
धार्मिक एकतेचा संदेश
मोशी परिसर वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांपैकी एक आहे. या भागांत विविध प्रांतांतील नागरिक स्थायिक झाले आहेत. त्यामुळे वंदनाताईंनी नेहमीच धार्मिक समरसतेचा संदेश दिला आहे. छटपूजा असो, गणेशोत्सव, उरुस, गुरुपौर्णिमा वा दिवाळी पहाट. त्या प्रत्येक सणाला आवर्जून उपस्थित राहतात. तसेच एकता व बंधुतेचा उत्सव म्हणून साजरा करतात.
नागरिकांच्या मनातील ताईसाहेब
मोशीतील प्रत्येक नागरिकांसाठी वंदनाताई म्हणजे विश्वासाचे प्रतीक. त्यांच्या साध्या स्वभावामुळे आणि प्रत्यक्ष जनतेशी संवादामुळे नेत्यापेक्षा त्या आपल्या घरच्या ताई म्हणून अधिक प्रिय आहेत. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांवर त्या सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत असतात. त्यांच्या पुढाकाराने अनेक सार्वजनिक सेवा-सुविधा उभारल्या गेल्या आहेत.
पंढरीची पायी वारी
आषाढी वारी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख आहे. त्यामधूनच महाराष्ट्राची खरी जडण-घडण झाली आहे. मोशी परिसराला श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदीचे सानिध्य लाभले आहे. त्यातूनच वंदनाताई आणि त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते हिरामण आल्हाट यांनी आषाढी वारीचे महत्व जपले आहे. हे दोघेही गेली सहा वर्षे श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत माउलींच्या पालखी सोहळ्यासोबत पायी वारी करत असतात.
नावापेक्षा कार्यावर विश्वास
वंदनाताईंची कार्यपद्धती शांत, पण परिणामकारक आहे. कुठलीही आक्रस्ताळेपणाने त्या भूमिका घेत नाहीत. प्रसिद्धीपेक्षा त्यांना लोककल्याण महत्च वाटते. ‘आपले कार्य हेच ओळख बनवते’, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळेच त्या कुठल्याही पदावर नसल्या तरी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतात. प्रेम, संवेदना आणि जबाबदारीची जाणीव हा त्यांच्या नेतृत्वाचा गाभा राहिला आहे. त्याद्वारे त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे.
कुटुंबवत्सल नेतृत्वाची प्रतिमा
वंदनाताई आल्हाट या फक्त समाजसेविका नाहीत; तर त्या कुटुंबवत्सल नेतृत्वाची प्रतिमा आहेत.
त्यांचे कार्य म्हणजे समाजाच्या प्रत्येक घटकाला जोडणारा दुवा ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे मोशी परिसरात एक विश्वास निर्माण झाला आहे. सेवा, संवेदनशीलता आणि समर्पण हीच खरी लोकनेत्याची ओळख असते. त्यामुळे त्याला अनुसरुनच मोशी, डुडुळगाव, चऱ्होली समाविष्ट सर्व भागांचा प्रभाग क्रमांक ३ हा आदर्श प्रभाग करण्याचा मानस ठेवूनच वंदनाताईंचे कार्य सुरू आहे.