मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नमो टुरिझम सेंटरवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. काल मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं होतं. यावेळी त्यांनी शिवरायांच्या गड किल्ल्यावर नमो सेंटर उभारल्यास ते तोडू असा इशाराही दिला होता. दरम्यान, राज ठाकरेंच्या याच टिकेला आता शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, ''राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. मला वाटतंय की कन्फ्युज नेत्यांमध्ये आणखी एका नेत्यांची भर पडली आहे. जर आम्ही लाव रे ते व्हिडिओ केले तर त्यांनी शिवसेना नेत्यांवर केलेली टीका समोर येईल. आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळी कोण आम्हाला धाडसी म्हणाले होतं? त्यांनी ज्या पंतप्रधान मोदींचं कौतुक केले ते आता त्यांना दुश्मन वाटू लागले आहेत.त्याच्या अशा वागण्याने मसैनिकांवर कोणता झेंडा घेऊ हाती असं म्हणण्याची वेळ आली आहे.''
Raj Thackeray : निवडणुकांमध्ये ‘मॅच फिक्सिंग’, राज ठाकरे; मतदार यादीत सुधारणा गरजेचीते पुढ म्हणाले, ''आम्ही कधीही राज ठाकरेंवर टीका केली नाही. उलट त्यांनी जे प्रस्ताव दिले त्याचा आम्ही सन्मान केला. मग तरीही त्यांची प्रवृत्ती कशी बदलली? आता आम्ही जर लाव रे तो व्हिडिओ केलं तर त्यांचा १८-२० वर्षाचा काळ समोर येईल. खर त एकनाथ शिंदेंवर अनेक जण टीका करतात, त्यात आणखी एका नेत्याची भर पडली आहे. पण आम्हाला काही फरक पडत नाही. जो पक्ष दावणीला बांधला होता तो आम्ही मुक्त केला आहे''. असं प्रत्युत्तरही त्यांनी दिलं.
Raj Thackeray : महाराष्ट्रात नवे ९६ लाख खोटे मतदार, आगामी निवडणुकांचा निकाल आधीच ठरलाय; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा''एकनाथ शिंदे सर्व गडकिल्ल्यावर सुविधा केंद्र स्थापन करणार आहेत. त्याला विरोध करायचं काय कारण आहे? तुम्हाला हवं असेल तर तुम्हीही सुविधा केंद्र सुरु करा, पण तोडण्याची भाषा का करत आहेत? मनसेच्या कार्यकर्त्यांना हे पटतं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जे इतरांना जमले नाही, ते एकनाथ शिंदे यांनी केलं आहे, असंही ते म्हणाले. राज ठाकरे यांना नेमकी भूमिका काय घ्यावी, हेच कळत नाही. सध्या त्यांचे जादूचे प्रयोग सुरू आहेत. उद्या कोणत्या पक्षात कोण जाईल हे कळणार नाही'', अशी टीकाही त्यांनी केली