बेवारस मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन
शिवडी, ता. २ (बातमीदार) ः कांजूरमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत २७ ऑक्टोबरला एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला पोलिसांनी विक्रोळी पूर्वेतील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखलपूर्व मयत पोषित केले.
कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताचे कुटुंबीय अद्याप मिळाले नसल्याने त्यांना शोधण्यासाठी पोलिस शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.
मयत विक्रम रमेश सिंह हे बेशुद्ध अवस्थेत कांजूरमार्ग पूर्व येथील मनसुख नाका येथे एका व्यक्तीला आढळून आले. त्यांच्या पॅंटच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डवरून त्यांची ओळख पटली. मात्र नातेवाईक अद्याप मिळून आले नसल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहोत. मयत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अमृता खाडे यांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, वर्ण सावळा, उंची ५ ते ५.५ फूट, केस अर्धवट टक्कल, दाढी-मिशा नाही, शर्ट चौकटी निळ्या रंगाचा आणि काळ्या रंगाची पँट घातली आहे.