महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २९८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
शफाली वर्मा आणि दीप्ती शर्माच्या अर्धशतकांनी भारताला मजबूत स्थितीत नेले.
ऋचा घोषच्या आक्रमक खेळीने भारताला ३०० धावांच्या जवळ पोहोचवले.
रविवारी (२ नोव्हेंबर) महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इतिहास रचला जाणार आहे. नवी मुंबईत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ या अंतिम सामन्यात आमने-सामने असून पहिल्या वर्ल्ड कप विजेतेपदासाठी उत्सुक आहेत. पावसामुळे दोन तास उशीराने सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर २९८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आता हा वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर दक्षिण आफ्रिकेला हे लक्ष्य पार करावे लागले, तर भारताला २९८ धावांच्या आत दक्षिण आफ्रिकेला रोखावे लागणार आहे. भारतासाठी शफाली वर्मा, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांनी चांगली फलंदाजी केली.
World Cup 2025 साठी शफाली वर्मा भारतीय संघातही नव्हती, पण नशीबनं संधी दिली अन् तिने फायनलमध्ये मैदान गाजवलं; पण शतक थोडक्यात हुकलंदक्षिण आफ्रिकेने नणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजासाठी उतरलेल्या भारताकडून स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी डावाची सुरुवात केली. एका बाजूने शफाली आक्रमक खेळ करत असताना दिला स्मृतीने चांगली साथ दिली.
या दोघींनी दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीला यश मिळू दिले नाही. दोघींनीही शतकी भागीदारीही केली. पण अखेर १८ व्या षटकात स्मृतीला क्लो ट्रायॉनने यष्टीरक्षक सिनालो जाफ्ताच्या हातून ४५ धावांवर झेलबाद केले. त्यामुळे तिची शफालीसोबतची १०४ धावांची भागीदारी तुटली.
पण शफालीने जेमिमा रोड्रिग्सला साथीला घेतले आणि डाव पुढे नेला. शफालीने अर्धशतक करत शतकाच्या दिशेनेही वाटचाल केली होती. शफाली आणि जेमिमा यांच्यातही अर्धशतकी भागीदारी झाल्याने भारताने १५० धावांचा टप्पाही एकच विकेट गमावत सहज पूर्ण केला होता.
मात्र शफालीला २८ व्या षटकात आयाबोंगा खाकाने बाद केले. शफालीने ७८ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ८७ धावा केल्या. तिच्या विकेटनंतर मात्र दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी पुनरागमन करत भारताला सहजासहजी धावा करू दिल्या नव्हत्या. जेमिमालाही खाकानेच २४ धावांवर बाद केले.
कर्णधार हरमनप्रीत कौरला २० धावांवर नॉनकुलुलेको एमलाबाने २० धावांवर त्रिफळाचीत केले, तर अमनजोत कौर १२ धावांवरच नादिन डी क्लर्कच्या गोलंदाजीवर तिलाच झेल देत बाद झाली. मात्र यानंतर दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांची जोडी जमली.
या दोघींनी भारतीय संघ ३०० धावांचा जवळ पोहचेल याची काळजी घेतली. त्यांनीही अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान, दीप्तीने या स्पर्धेतील तिसरे अर्धशतकही केले. ऋचाही आक्रमक खेळत होती.
Women’s World Cup Final : स्मृती मानधनाने मोडला मिताली राजचा मोठा विक्रम; शफालीसह नोंदवला पराक्रम, ठरली जगातील दुसरीच जोडीपण ४९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऋचाला खाकाने बाद केले. ऋचाने २४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३४ धावांची खेळी केली. दीप्ती शर्मा शेवटच्या चेंडूवर धावबाद झाली. दीप्तीने ५८ चेंडूत ५८ धावा केल्या. अखेर भारताने ५० षटकात ७ बाद २९८ धावा केल्या. राधा यादव ३ धावांवर नाबाद राहिली.
गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेकडून आयाबोंगा खाकाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. नॉनकुलुलेको एमलाबा, नादिन डी क्लर्क आणि क्लो ट्रायॉन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.