01963
शेर्ले सरपंच जाधव यांना ‘आदर्श’ पुरस्कार
बांदा ः महाराष्ट्र प्रदेश सरपंच सेवा संघ अहिल्यानगर तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार शेर्ले (ता. सावंतवाडी) येथील सरपंच सौ. प्रांजल जाधव यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरुप आहे. महाराष्ट्र प्रदेश सरपंच सेवा संघ अहिल्यानगरतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षीचा आदर्श सरपंच पुरस्कारासाठी राज्यभरातून सौ. जाधव यांची निवड झाली होती. अहिल्यानगर - सावेडी रोड येथील माऊली संकुल सांस्कृतिक सभागृहात हा राज्यस्तरीय सन्मान सोहळा झाला. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, श्रीमहंत डॉ. श्रीकांत धुमाळ महाराज, समाजसेवक यादवराव पानसे, संघाचे संस्थापक तथा सरपंच संघटीत चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार, संपर्क प्रमुख अमोल शेवाळे उपस्थित होते.