मोशी उपबाजारात आवकमध्ये दहा टक्क्यांनी वाढ
esakal November 03, 2025 05:45 PM

मोशी, ता. २ : सध्या शेतीमालाच्या वाढीस पोषक वातावरण असल्याने श्री नागेश्वर महाराज उपबाजार समिती येथे शेतीमाल पालेभाज्या, फळभाज्या व फळांची आवक दहा टक्क्यांनी वाढली आहे. कोथिंबीर, शेपू, टोमॅटो, कोबी आदींचे भाव कमी झाले आहेत. मात्र, उर्वरित शेतीमालाची आवक आणि भाव स्थिर आहेत.

पालेभाज्यांची एकूण आवक : ४८ हजार ८०० जुड्या
कोथिंबीर : २८ हजार ९००, मेथी : ५ हजार ८००, शेपू : १ हजार ७००, कांदापात : १ हजार ७००, पालक : ६ हजार, मुळा : ३०० पुदिना : ३ हजार ३००, लालमाठ ३०० आदी पालेभाज्यांची एकूण ४८ हजार ८०० जुड्यांची आवक झाली आहे.
पालेभाज्यांचे भाव (एका जुडीचे) ः कोथिंबीर : ५ ते १० रुपये, मेथी : १५ ते २०, शेपू : १२ ते १५, पालक : १२ ते १५, कांदापात : १५ ते १८, चवळी : १२ ते १५, पुदीना : ५ ते १०

फळभाजीची एकूण आवक : ४ हजार ४२८ क्विंटल
कांदा : ५५१, बटाटा : ८४१, आले : ९६, भेंडी : १०२, गवार : १९, टोमॅटो : ७३७, मटार : १५, घेवडा : ४३, दोडका : ३३, मिरची : २०७, दुधी : ७३, लाल भोपळा : ८६, काकडी : १३३, कारली : ९५, गाजर : ८५, फ्लॉवर : ३५८, कोबी : ३०४, वांगी : ९४, ढोबळी : ९७, बीट : २१, पावटा : ८, चवळी १२, लिंबू : ८८, कढीपत्ता : २७, मका कणीस : ५९ आदी फळभाज्यांची एकूण आवक ४ हजार ४२८ क्विंटल झाली.

फळभाज्यांचे भाव (एक किलोचे) ः कांदा : १८ ते २०, बटाटा : १८ ते २२, लसूण : ८० ते १००, आले : ४० ते ६०, भेंडी : ४० ते ५०, गवार : ८० ते १००, टोमॅटो : १० ते १५, मटार : १३० ते १५०, घेवडा : ५० ते ६०, दोडका : ५० ते ६०, मिरची : ६० ते ७०, दुधी भोपळा : ४० ते ५०, लाल भोपळा : ५० ते ६०, काकडी : ३० ते ४०, कारली : ५० ते ६०, गाजर : ३० ते ४०, पापडी : ४० ते ५०, फ्लॉवर : ४० ते ५०, कोबी : ३० ते ४०, वांगी : ५० ते ६९, ढोबळी : ५० ते ६०, सुरण : ५९ ते ६०, तोंडली जाड : ३० ते ४०, बारीक : ४० ते ५०, बीट : ३० ते ४०, कोहळा : ५० ते ६०, पावटा : ५० ते ६०, वाल : ५० ते ६०, वालवर : ५० ते ६०, शेवगा : ८० ते १००, ढेमसे : ५० ते ६०, परवर : ६० ते ७०, भावनगरी : ४० ते ५०, चवळी : ४० ते ५०, रताळी : ६० ते ७०, दोडका : ५० ते ६०, घोसाळी : ५० ते ६०, कढीपत्ता : ४० ते ५०, आरवी : ४० ते ५०, लिंबू : ५० ते ६०, मका कणीस : ४० ते ५०

फळबाजारात फळांची एकूण आवक : ६३८ क्विंटल
सफरचंद : २८, मोसंबी : ६, डाळिंब : १४, पेरू : १४, पपई : १४५, चिकू : ५, केळी : ८७, सीताफळ : ३४, अननस : ४, कलिंगड १० आदी विविध प्रकारच्या फळांची एकूण आवक ६३८ क्विंटल झाली.
फळांचे बाजारभाव (एक किलोचे) ः सफरचंद : ११० ते १४०, मोसंबी : ५० ते ८०, डाळिंब : १०० ते १४०, पेरू : ५० ते ८०, पपई : २५ ते ३०, चिक्कू : ७० ते ८०, केळी : ५० ते ६०, शहाळे नारळ : ६० ते ७०, किवी : ७० ते ८०, पेर : ७० ते ८०, स्ट्रॉबेरी : १०० ते १२०, अननस : ६० ते ७०, आवळा : ४० ते ५०, ड्रॅगन फ्रूट : १५० ते १८०

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.