आळेफाटा, ता. २ : कार्तिक एकादशीनिमित्त आळे (ता. जुन्नर) येथील रेडा समाधी मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी महापूजा तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, बाळासाहेब चौगुले यांच्या हस्ते समाधी मंदिरात अभिषेक घालण्यात आला. 
याप्रसंगी ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश कुऱ्हाडे, उपाध्यक्ष संदीप पाडेकर, सचिव जीवन शिंदे, खजिनदार संजय गुंजाळ, व्यवस्थापक कान्हू कुऱ्हाडे उपस्थित होते. यावेळी आळेफाटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत केली.