पोखरी घाटात चारचाकी मोटार पलटी
esakal November 04, 2025 01:45 PM

भीमाशंकर, ता. २ : भीमाशंकर येथून देवदर्शन करून मुंबईकडे परत जात असताना मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटात कलमजामाता मंदिराजवळ वळणावर चारचाकी मोटार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी होऊन अपघात घडल्याची घटना शनिवारी (ता. १) सायंकाळी घडली.
घटनास्थळी घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार बाळासाहेब सुरकुले आणि त्यांचे सहकारी दाखल झाले. अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून दोन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घोडेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.