Bigg Boss Update : कलर्स टीव्हीवरील बिग बॉस 19 मधून मराठी कॉमेडियन प्रणित मोरेचं एव्हिक्शन झालं आहे. काल रात्री ही बातमी प्रसारमाध्यमांनी जाहीर केली. पण प्रणितच्या अचानक एलिमिनेशनमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. पण प्रकृतीच्या कारणावरून त्याचं एलिमिनेशन केल्याचं समजत आहे.
वीकेंड का वार पूर्वीच प्रणीतला शोमधून बाहेर काढण्यात आलं. त्यापूर्वीच तो घराचा कॅप्टन झाला होता. त्यामुळे त्याच्या एलिमिनेशनमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बिग बॉस खबरीने दिलेल्या वृत्तानुसार, प्रणीतला डेंग्यूचं निदान झालं आहे. गेले काही दिवस त्याची तब्येत खूप खराब आहे. अगदी बेडवरुन उठताही येत नाही अशी त्याची अवस्था होती. त्यामुळे त्याचं तात्पुरतं एव्हिक्शन करून त्याला घराबाहेर काढण्यात आलं आहे. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर आणि डॉक्टरांच्या परवानगीने पुन्हा एकदा त्याला घरात प्रवेश देण्यात येईल.
प्रणितचा घरातील वावर सगळ्यांना आवडला होता. सध्या बिग बॉस मराठीत आघाडीच्या स्पर्धकांपैकी तो एक आहे. त्यामुळे त्याचा एक मोठा चाहतावर्गही निर्माण झाला आहे.
काही पेजेसच्या मते प्रणित सोमवारी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात कमबॅक करणार आहे. पण याबाबत किती तथ्य आहे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागेल. प्रणितला सिक्रेट रूममध्ये न ठेवता हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा निर्णय बिग बॉसच्या टीमने त्याच्या जास्त खालावलेल्या प्रकृतीमुळं घेतला आहे.
चेहऱ्यावर व्रण, पांढरे केस आणि डॅशिंग अंदाज !वाढदिवसादिवशी शाहरुखची चाहत्यांना खास भेट; Teaser Viral !