भारताच्या विरोधात 7 देशांनी शिजवली खिचडी, पाकिस्तानचा रडीचा डाव, तब्बल इतके तास…
Tv9 Marathi November 04, 2025 02:45 PM

मुस्लिम देशांना हाताशी धरून भारताच्या विरोधात मोठा गेम करताना पाकिस्तान दिसत आहे. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला पहलगामवर केला. यानंतर भारताने पाकला जोरदार उत्तर देत त्यांच्या देशात घुसून दहशतवादी हल्ले नष्ट केली. भारताला म्हणावे तसे उत्तर देण्यातही पाकिस्तानला यश मिळाले नाही. भारतासोबत लढण्याची क्षमता नसल्याचे लक्षात येताच पाकिस्तानने अनेक मुस्लिम देशांसोबत संरक्षण करार करण्यास सुरूवात केली. साैदी अरेबियासोबत त्यांनी मोठा करार केला. आता नुकताच मुस्लिम देशांच्या नेत्यांची एक बैठकी तुर्कीमध्य झाली. गाझा युद्धबंदीची चर्चा झाल्याचे सांगितले जातंय. मात्र, या बैठकीत काहीतरी मोठी खिचडी शिजल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

या बैठकीला पाकिस्तान, कतार, साैदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया, जॉर्डन आणि तुर्की उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तान भारताच्या विरोधात कारवाई करत आहे. तुर्की थेट भारताच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहे. तुर्कीचे इस्तंबूल येथे झालेल्या या बैठकीचे उद्दिष्ट गाझामध्ये कायमस्वरूपी शांततेसाठी मुस्लिम देशांच्या संयुक्त प्रयत्नांना बळकटी देणे हे होते, असे सांगितले जात आहे.

तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान म्हणाले की, ही संघटना अद्याप पूर्णपणे तयार झालेली नाही आणि तिच्या जबाबदाऱ्या अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. सध्या सैन्याची वाटाघाटी सुरू आहे. 10 ऑक्टोबरपासून युद्धबंदी लागू आहे. मात्र,  उल्लंघनांच्या बातम्या आल्या आहेत. गाझामधील परिस्थिती अस्थिर आहे आणि मानवीय संकट असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, या बैठकीमध्ये याशिवाय दुसऱ्याही मुद्द्यांवर चर्चा झाली.

पाकिस्तान सध्या मोठा गेम करत असून भारताविरोधात मुस्लिम देशांना एकत्र आणत असल्याचे सांगितले जातंय. साैदी अरेबियासोबत त्यांनी मोठा करार केला. त्या करारानुसार, पाकिस्तानवर हल्ला म्हणज साैदी अरेबियावर समजला जाईल. यासोबतच तुर्की आणि पाकिस्तानने एकत्र येत मालदीववर मोठा दबाव टाकत मोठा करार करण्यास भाग पाडले. हेच नाही तर तुर्की आणि पाकिस्तान एकत्र येऊन भारताविरोधात काम करत असल्याचेही अनेकदा स्पष्ट झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.