आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला एकदा नाही तर तीनदा पराभवाची धूळ चारली. इतकंच काय पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही की मोहसिन नकवीच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही. पण ट्रॉफी मैदानात सोडून जाण्याऐवजी पाकिस्तानचा मोहसिन नकवी ती चोरून घेऊन गेला. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली. मोहसिन नकवीने चोरली असल्याचं उघड असूनही त्याने ती ट्रॉफी भारतीय संघाला दिलेली नाही. आयसीसीने एसीसीला पत्र लिहून याबाबत तक्रार केली होती. इतकंच काय तर ट्रॉफी मुंबई पाठवण्यास सांगितलं होतं. पण चोरटा नकवीने नवा कांगावा करत ट्रॉफी बीसीसीआयच्या प्रतिनिधी किंवा सदस्याला मीच सोपवणार असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणी बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयसीसी बैठकीत हा मुद्दा उचणार असल्याचं स्पष्ट केलं. पण या बैठकीपूर्वी मोहसिन नकवीने पळ काढला आहे.
मोहसिन नकवी घाबरून पळाला?आयसीसी कार्यकारिणी बैठकीची दुबईत चार दिवसीय बैटक आहे. या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष मोहसिन नकवी येणं कठीण दिसत आहे. देशांतर्गत राजकीय कारण पुढे करत त्याने या बैठकीतून माघार घेतली आहे. या बैठकीत बीसीसीआय आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा उचलणार हे माहिती असल्याने त्याला पळ काढल्याचं बोललं जात आहे. यामुळे नकवीचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. पीसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, नकवीच्या जागी बोर्डाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुमैर सय्यद या बैठकीत भाग घेणार आहे. नकवी दुबईत गेला नाही तर 7 नोव्हेंबरला पाकिस्तानकडून सुमैर सय्यद बैठकीत भाग घेईल. दुसरीकडे, नकवी या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
भारताने जिंकलेली आशिया कप ट्रॉफी मोहसिन नकवीने एसीसी मुख्यालयात ठेवली आहे. एका कपाटात टाळं लावून ठेवली आहे. तसेच ती कोणालाच देऊ नये असा आदेशही दिला आहे. त्यामुळे बीसीसीआयने संताप व्यक्त केला आहे. आयसीसी बैठकीत बीसीसीआय मोहसिन नकवीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करू शकते. दुसरीकडे, आयसीसी अध्यक्षपदाची सूत्र जय शाह यांच्या हातात आहेत. त्यांची नियुक्ती झाल्यापासून नकवी कोणत्याही आयसीसी मीटिंगमध्ये सहभागी झालेला नाही.