एका मोठ्या विमानाचा अपघात झाल्याची घटना पुढे येतंय. अमेरिकेतील केंटकी येथील लुईसव्हिल येथून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच यूपीएस मालवाहू विमान कोसळले. या घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. मंगळवारी साधारणपणे 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. लुईसव्हिल विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या यूपीएस विमानाचा मोठा अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. टेकऑफनंतर काही सेकंदाच हे विमान कोसळले. गुजरातमधील अहमदाबादमध्येही असाच एअर इंडियाच्या विमानाता अपघात झाला होता. टेकऑफच्या काही सेकंदात विमान कोसळले होते.
टेकऑफनंतर काही सेकंदात विमानाचा अपघात
लुईसव्हिल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान हवाईकडे जात होते. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, UPS MD-11 विमान उड्डाणानंतर कोसळले. सध्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB) या अपघाताची सखोल चौकशी करत आहे. सध्याच्या परिस्थितीलाच हा अपघात नेमका कसा झाला हे सांगणे शक्य नसल्याने तपास यंत्रणांकडून सांगण्यात आले.
अपघाताच्या पूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पोलिसांनी सांगितले की, अपघातात काही लोक जखमी झाले आहेत, आता त्यांची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. हेच नाही तर सध्या सोशल मीडियावर या विमानाचा टेकऑफ करतानाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. विमान अगदी व्यवस्थित टेकऑफ करताना देखील स्पष्टपणे दिसतंय. हा व्हिडीओ तपास यंत्रणांच्या कामाला येईल. अपघातात नेमके कोण तीन जण मृत्यू झाले याची माहिती घेतली जात आहे.
तपास यंत्रणांकडून विमान अपघाताची चाैकशी सुरू
लुईसविले मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात मोठे विमानतळ आहे. यूपीएसचे जगातील सर्वात मोठे केंद्र आहे. कंपनीचे वर्ल्डपोर्ट आहे, पाच दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळावर हे पसरलेले आहे. दररोज 13,000 हून अधिक कर्मचारी अंदाजे दोन दशलक्ष पार्सल प्रक्रिया करतात. हे एक अत्यंत मोठे सर्कल आहे. दररोज अनेक पार्सल येथून जातात येतात. आता विमान अपघात नेमका कसा झाला याची माहिती घेतली जातंय.