अमेरिकेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठा दावा, व्यापार कराराबद्दल थेट विधान, दिवाळीच्या दिवशीच…
GH News November 05, 2025 11:09 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र असल्याचे सांगताना दिसतात. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, आम्ही त्यांच्यावरील अतिरिक्त टॅरिफ काढू असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेची पोटदुखी उठलीये. भारतावर प्रचंड दबाव अमेरिकेचा आहे. धक्कादायक म्हणजे आता भारताने हळूहळू करून रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याचे येणाऱ्या आकड्यांवरून दिसतंय. रशियाकडून भारतापेक्षा चीन अधिक तेल खरेदी करतो. मात्र, त्या चीनवर कोणतीही कारवाई अमेरिकेने केली नाहीये. आता टॅरिफवरून तणाव असतानाच व्हाईट हाऊसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत मोठा दावा केला.

व्हाईट हाऊसचे प्रेस सचिन कॅरोलीन लीविने म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खूप जास्त सन्मान करतात. दोघांमध्ये कायमच संवाद होत असतो. भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा अंतिम टप्प्यात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची टीम सतत भारताच्या संपर्कात असून व्यापारावर चर्चा होतंय. गंभीरपणे व्यापार करारावर काम सुरू आहे. लीविटने सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळीच्या दिवशी नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधला होता.

डोनाल्ड ट्रम्प भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर खूप जास्त सकारात्मक आहेत. भारताला खूप जास्त महत्वपूर्ण ते मानतात. अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर भारतात खूप जास्त काम चांगले करत आहेत. गेल्या आठवड्यात कोरियाच्या दाैऱ्यावर असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापार करारावर भाष्य केले होते. अमेरिकेने रशियाच्या काही तेल कंपन्यांवर बंदी घातल्याने भारतात होणारी रशियाची तेल आयात कमी झालीये.

अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतासोबत व्यापार करायचा आहे. भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा जवळपास बंद झाली होती. भारत आम्हाला प्रतिसाद व्यापार करार करण्यासाठी देत नसल्याचे अमेरिकेने म्हटले होते. भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावल्याने भारतातून अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात कमी झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.