मोठी कारवाई करत, धनबाद रेल्वे संरक्षण दलाने दून एक्स्प्रेसच्या महिला डब्यातून ७८ जिवंत कासवे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या कासवांची अंदाजे बाजारातील किंमत सुमारे आठ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात आरपीएफ अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला.
तपासादरम्यान सीटखालून कासवे जप्त करण्यात आली असून ती वनविभागाच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. तपासादरम्यान सीटखालून सहा बेवारस कापडी पिशव्या जप्त करण्यात आल्या. टीमने जवळपासच्या महिला प्रवाशांची चौकशी केली असता, कोणीही त्या बॅगवर दावा केला नाही. संशय आल्यावर पिशव्या उघडल्या. ज्यामध्ये भारतीय फ्लॅपशेल प्रजातीची 78 जिवंत कासवे तागाच्या पोत्यात बंदिस्त आढळून आली.
या संदर्भात आरपीएफ अधिकाऱ्यांनी सांगितले की, याप्रकरणी अज्ञात तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते म्हणाले की, ही यशस्वी मोहीम वन्यजीव तस्करी रोखण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.







