डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन रशियन तेल कंपन्यांवर थेट बंदी घातली. त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसून आले. भारतात होणारी रशियन तेलाची निर्यात देखील कमी झाली. भारताने अमेरिकेच्या दबावापुढे रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याचा दावा केला जात होता. मात्र, या दरम्यानच भारताला मोठा फायदा झाला. अमेरिकेने रशियन तेल कंपन्यां रोझनेफ्ट आणि लुकोइलकडून तेल खरेदीवर बंदी घातली आहे. यामुळे भारतात होणारी तेल निर्यात देखील कमी झाली. दरम्यान, रशियाने आता तेलाच्या किंमती कमी केल्याची बातमी आहे. यामुळे भारताचा डबल फायदा झाल्याचे बघायला मिळातंय. मागील काही दिवसांपासून रशिया सतत भारताला तेल खरेदीमध्ये अनेक सवलती देताना दिसत असतानाच आता थेट भारत मालामाल होईल.
रॉयटर्सला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने भारत आणि चीनला तेलावर देण्यात येणारी सवलत वाढवली आहे. डिसेंबर डिलिव्हरीसाठी ब्रेंटच्या तुलनेत रशियाच्या प्रमुख युरल्स क्रूडची किंमत $4 प्रति बॅरलने कमी झाली असल्याने भारताची मजाच मजा आहे. तब्बल एक वर्षानंतर युरल्स क्रूडची किंमत इतकी जास्त कमी झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कच्च्या तेलावरील सवलतीत आणखी $2 ने वाढ रशियाने केली आहे.
2022 मध्ये पश्चिमी देशांनी रशियन तेलावर लादलेल्या निर्बंधांनंतर ही सवलत अपेक्षेपेक्षा तशी कमीच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या रोझनेफ्ट आणि लुकोइल तेल कंपन्यांवर लावलेल्या निर्बंधांनंतर भारताच्या प्रमुख रिफायनरी कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, मित्तल एनर्जी, मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी डिसेंबर डिलिव्हरीसाठी रशियन तेलाच्या ऑर्डर थांबवल्या.
अमेरिकेच्या निर्बंधांनंतर चीनच्या सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनीही समुद्रमार्गे येणाऱ्या रशियन तेलाची खरेदी थांबवली आहे. हा मोठा झटका रशियाला बसला. मात्र, आता रशियाने थेट तेलाच्या किंमतींमध्ये मोठी सूट भारताला दिली आहे. अमेरिकेने जरी भारतावर टॅरिफ लावला असला तरीही भारताचा चांगलाच फायदा होताना सध्या दिसत आहे. भारताला रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवायची आहे. मात्र, भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर प्रचंड असा दबाव असल्याचे बघायला मिळतंय.