>> नीलिमा प्रधान
तारतम्य ठेवा
मेष- सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध मंगळ युती. साडेसाती सुरू आहे. विघ्नसंतोषी लोक कामात अडचणी निर्माण केल्या जातील. नोकरीमध्ये इतरांना कमी समजू नका. धंद्यात वाद, तणाव नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तारतम्य ठेवा. शुभ दिवस. १३, १४
अहंकार दूर ठेवा
वृषभ- चंद्र, गुरू युती, चंद्र बुध त्रिकोण योग. भावनेच्या आहारी जाऊ नका. अहंकार दूर ठेवा. कठीण कामे करून घ्या. वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया होतील. वाहनाचा वेग कमी ठेवा. शुभ दिवस. 10, 11
नोकरीत प्रभाव रहा
मिथुन- सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र गुरू युती. प्रत्येक दिवस यश देणारा. नोकरीत प्रभाव वाढेल. धंद्यात वाद न करता व्यवहार करा. थट्टामस्करी सांभाळून करा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गजांची ओळख होईल. शुभ दिवस. १२, १३
कामे पूर्ण करा
कर्क – चंद्र, गुरू युती, चंद्र बुध त्रिकोणयोग. अडचणीत आलेली कामे पूर्ण करा. नम्रता ठेवा. नोकरीत कामाचा ताण असली तरी प्रगती कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज वाढेल असे वागू नका. महत्त्वाचे मुद्दे मांडता येतील. शुभ दिवस. १२, १३
मोह दूर ठेवा
सिंह- सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरू लाभयोग. भावनेच्या भरात कोणतेही विधान करू नका. स्वतच्या हिमतीवर कोणतेही काम करा. नोकरीत प्रभाव टिकवणे सोपे नाही. अहंकारयुक्त टिप्पणी करू नका. मोह नका ठेऊ. शुभ दिवस. १३, १५
नोकरीत बदल घडेल
कन्या- बुध, मंगळ युती, चंद्र, गुरू लाभ योग. तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. नविन ओळख फायदेशीर ठरेल. कोणतेही कठीण काम रेंगाळत ठेऊ नका. नोकरीत चांगला बदल होईल. परदेशात जाण्याची संधी लाभेल. शुभ दिवस. 10, 11
प्रगतीची संधी मिळेल
तूळ- चंद्र, गुरू युती, बुध मंगळ युती. सप्ताहाच्या शेवटी मनाविरुद्ध घटना घडेल. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. ध्येयावर लक्ष ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. नविन ओळख उत्साह वाढवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहकार्य लाभेल. शुभ दिवस.10, 11
रागावर नियंत्रण ठेवा
वृश्चिक- बुध, मंगळ युती, चंद्र गुरू लाभ योग. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाची काळजी घ्या. अडचणींतून प्रगतीचा मार्ग शोधावा लागेल. अहंकार दूर ठेवा. भावनेच्या आहारी जाऊन चूक करू नका. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संयम बाळगा. शुभ दिवस. १२, १३
कठोर बोलू नका
मधु- सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र शुक्र लाभयोग. तुमच्यावर विश्वास ठेवणार्या व्यक्तीचे मत बदलले जाईल कठोर बोलू नका. नोकरीत तत्परता ठेवा. धंद्यात हलगर्जीपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गुप्त कारवाया समजतील. शुभ दिवस. १३, १४
कामाचे कौतुक होईल
मकर- सूर्य चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरू लाभयोग. महत्त्वाची कामे करून घ्या. भेटीत यश मिळेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. कामाचे कौतुक होईल. खरेदी-विक्रीत लाभ. किचकट प्रश्न मार्गी लागतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व पटेल. शुभ दिवस. 11, 15
फसगत टाळा
कुंभ- सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र शुक्र लाभयोग. या सप्ताहात अनेक ठिकाणी लक्ष द्यावे लागेल. दगदग होईल. कठोर वक्तव्य टाळा. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील. कुणालाही गृहित धरू नका. शुभ दिवस. १३, १४
तटस्थ भूमिका घ्या
मीन- बुध, मंगळ युती, चंद्र गुरू लाभयोग. गुप्त कारवायांना कमी लेखू नका. जवळच्या व्यक्तीत दुरावा जाणवेल. मनावर दडपण येईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी पाहून बोला. नविन परिचयात सावध रहा. राजकीय, क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्या. शुभ दिवस. 11, 15