छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांमधील एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही कॉमेडी मालिका गेल्या 17 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील काही कलाकार मालिका सोडताना दिसत आहेत. पण आता असे म्हटले जात आहे की या मालिकेतील एक जुना कलाकार पुन्हा दिसणार आहे. आता हा कलाकार कोण आहे? चला जाणून घेऊया…
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शोची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. तेव्हा त्यात टप्पूची भूमिका भव्य गांधीने साकारली होती. या भूमिकेने त्याला संपूर्ण देशात प्रसिद्धी मिळवून दिली होती. भव्य २००८ ते २०१७ पर्यंत शोचा भाग होता. त्याने शो सोडल्यानंतरही भव्य लवकरच ‘तारक मेहता’मध्ये परत येणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. आता याबाबत स्वत: भव्यने माहिती दिली आहे. तो काय म्हणाला जाणून घ्या…
किती मानधन घेत होता?
भव्य गांधीने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत ‘तारक मेहता’बाबत खुलासा केला. यावेळी त्याने शोमध्ये मिळणाऱ्या फीचाही उल्लेख केला. अभिनेत्याने सांगितले, “मला माहित नव्हते की शोसाठी किती पैसे मिळतात, कारण मी तेव्हा खूप लहान होतो. सर्व पैसे व्यवहार माझे आई-बाबा सांभाळत होते. मी हा शो सोडला कारण मी काहीतरी वेगळे करू इच्छित होतो. म्हणून मी गुजराती चित्रपटांकडे वळलो आणि आता तिथेही ओळख निर्माण केली आहे.”
८ वर्षांनंतर ‘तारक मेहता’मध्ये परतणार भव्य गांधी?
जेव्हा भव्यांना विचारले की तो पुन्हा ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये परत येऊ इच्छितात का? तेव्हा अभिनेत्याने सांगितले, “हो, जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच परत येऊ इच्छितो. मला वाटले की माझ्या आयुष्यातील एक चाप्टर पूर्ण झाले आहे. या शोचा माझ्या करिअरमध्ये खूप मोठा वाटा आहे. यासाठी मी शोच्या संपूर्ण टीमचा नेहमीच आभारी राहीन…”