Lapandav Video : सखीची खरी आई कोण? 'लपंडाव' मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रेक्षकांना बसला धक्का
Saam TV November 10, 2025 02:45 AM

'लपंडाव' मालिकेत मुख्य भूमिकेत मराठी अभिनेत्री रुपाली भोसले झळकली आहे.

'लपंडाव' मालिकेचा धक्कादायक प्रोमो समोर आला आहे.

मालिकेत सखीच्या खऱ्या आईचा उलगडा होणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर 'लपंडाव' (Lapandav ) मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. रोज सरकार आणि सखी मधील वाद वाढताना दिसत आहेत. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवीन प्रोमोमध्ये सखीच्या खरी आईची ओळख समजली आहे. जे पाहून प्रेक्षक चांगलेच गोंधळले आहेत.

View this post on Instagram

'लपंडाव' मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. सरकार ही सखीची खरी आई नाही. सखीची आई कोणतरी वेगळी आहे. व्हिडीओत तिची झलक पाहायला मिळाली आहे. सखीच्या खऱ्या आईचे नाव तेजस्विनी आहे आणि सध्या सरकारच्या रुपात जी सखीबरोबर राहतेय ती मनस्विनी आहे. तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघी बहिणी आहेत. सखीच्या खऱ्या आईला किडनॅप करून सरकारने मोठा डाव खेळला आहे.

नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सखीआणि कान्हामध्ये वाद होतो. तेव्हा सखी रडत साईबाबांच्या मंदिरात जाते. म्हणते की, "कधी मिळणार आहे मला माझी आई" तेवढ्यात काही गुंड येतात आणि एका बाईला किडनॅप करण्याचा प्रयत्न करतात हे सर्व कान्हा पाहतो आणि त्या बाईच्या मदतीला जातो. तेवढ्यात सरकार तेथे एक गाडी घेऊन येतात आणि त्या बाईला गाडीत ओढतात. तेव्हा सरकारआणि सखीची खरी आई समोरासमोर येते. हे दृश्य पाहून प्रेक्षक गोंधळतात.

View this post on Instagram

सखीची खरी आई तेजस्विनी देखील सरकार सारखी दिसते. म्हणजेच 'लपंडाव' मालिकेत रुपाली भोसलेचा डबल रोल पाहायला मिळणार आहे. ती दुहेरी भूमिका बजावणार आहे. यामुळे मालिकेला आता रंजक वळण आले आहे. प्रेक्षकांना हा ट्विस्ट आवडल्याचे दिसत आहे. 'लपंडाव' मालिकेत रुपाली भोसले, चेतन वडनेरे आणि कृतिका देव हे कालाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. 'लपंडाव' मालिका दुपारी 2 वाजता पाहायला मिळते. या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Famous Influencer Death : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं निधन; ३२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, नेमकं कारण काय?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.