NZ vs WI 4th T20i : न्यूझीलंड मालिका विजयसाठी सज्ज, वेस्ट इंडिज रोखणार? चौथा सामना केव्हा?
GH News November 10, 2025 03:12 AM

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. विंडीजने या दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. विंडीजने टी 20i मालिकेतील पहिला सामना जिंकला. विंडीजने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने सलग 2 सामने जिंकले. न्यूझीलंडने यासह पहिल्या पराभवाची परतफेड करत मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. त्यामुळे आता न्यूझीलंडकडे चौथ्या सामन्यात सलग आणि एकूण तिसरा विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला विंडीजसाठी मालिकेच्या दृष्टीने हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे या सामन्याच चाहत्यांना चुरस पाहायला मिळणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामना केव्हा?

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामना सोमवारी 10 नोव्हेंबरला होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामना कुठे?

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामना नेल्सनमधील सेक्सटन ओव्हल येथे होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार पहाटे पावणे 6 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 5 वाजून 15 मिनिटींनी टॉस होईल.

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड विरुद्ध विंडीज चौथा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपद्वारे हा सामना मोबाईलवर लाईव्ह पाहायला मिळेल.

मिचेल सँटनर याच्याकडे न्यूझीलंडच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर शाई होप विंडीजचं नेतृत्व करतोय. न्यूझीलंडने सलग 2 सामने जिंकल्याने त्यांचा विश्वास दुणावलेला आहे. तसेच न्यूझीलंडकडे चौथ्या सामन्यात सलग तिसरा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक पूर्ण करण्यासह मालिका नावावर करण्याची दुहेरी संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला विंडीजसमोर चौथ्या टी 20i क्रिकेट सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्यासह पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचं दुहेरी आव्हान आहे. अशात आता कोण यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दोघांपैकी सरस कोण?

दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध विंडीज यांच्यात आतापर्यंत 23 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. न्यूझीलंडने त्यापैकी सर्वाधिक 12 सामने जिंकले आहेत. तर विंडीजने 9 वेळा विजय मिळवला आहे. तर 2 सामन्यांचा निकाल लागला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.