पाकिस्तान क्रिकेट टीमने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी, टी 20I आणि एकदिवसीय मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. उभयसंघातील 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली. त्यानंतर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 2-1 ने पराभूत केलं. तर 3 मॅचची वनडे सीरिज 2-1 ने जिंकली आणि दक्षिण आफ्रिकेला रिकाम्या हाती पाठवलं. त्यानंतर आता पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेनंतर श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. तसेच त्यानंतर पाकिस्तान, श्रीलंका आणि झिंबाब्वे यांच्यात टी 20I ट्राय सीरिज होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या दोन्गही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे.
शाहीन शाह अफ्रिदी वनडे सीरिजमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर ट्राय सीरिजमध्ये सलमान आघा याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. उभयसंघात 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हे 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. तिन्ही सामन्यांचं आयोजन हे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
वनडे सीरिजसाठी पाकिस्तान टीम : शाहीन शाह अफ्रिदी (कॅप्टन), अबरार अहमद, बाबर आजम, फहीम अशरफ, फैसल अकरम, फखर जमा, हारिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, सॅम अयूब, हसीबुल्लाह, हुसैन तलत, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर) आणि सलमान अली आगा.
वनडे सीरिजचं वेळापत्रकपहिला सामना, मंगळवार, 11 नोव्हेंबर, रावळपिंडी
दुसरा सामना, गुरुवार, 13 नोव्हेंबर, रावळपिंडी
तिसरा सामना, शनिवार, 15 नोव्हेंबर, रावळपिंडी
ट्राय सीरिजपाकिस्तान वनडेनंतर श्रीलंका आणि झिंबाब्वे विरुद्ध ट्राय सीरिज खेळणार आहे. पाकिस्तान या मालिकेत 17 ते 29 नोव्हेंबर दरम्यान एकूण 7 टी 20I सामने होणार आहेत. प्रत्येक संघाला या मालिकेत 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.
ट्राय सीरिजसाठी पाकिस्तान टीम : सलमान अली आगा (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, फखर झमान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह अफरीदी, उस्मान खान (विकेटकीपर), उस्मान तारिक, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान (विकेटकीपर) आणि सॅम अयूब,