रणजी ट्रॉफी स्पर्धा ही देशातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. 2025-2026 या वर्षासाठी पर्व सुरु झालं असून चौथ्या टप्प्याचे सामने सुरु आहेत. 8 नोव्हेंबरपासून प्रत्येक संघ चौथा सामना खेळत असून सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी काही सामन्यांचा निकाल लागला आहे. तिसऱ्या दिवशी मुंबई, यपी आणि उत्तराखंडने एका डावाने विजय मिळवला आहे. तर आंध्र प्रदेशने तामिळनाडूला 4 विकेट राखून पराभूत केलं. मुंबईचा सामना हिमाचलशी, युपीचा सामना सामना नागालँडशी, तर उत्तराखंडचा सामना हरयाणाशी झाला. तामिळनाडूने पहिल्या डावात 182 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना आंध्र प्रदेशचा संघ 177 धावांवर बाद झाला. तामिळनाडूने दुसऱ्या डावात 195 धावा केल्या. आंध्र प्रदेशने 6 गडी गमवून दिलेलं आव्हान पूर्ण केलं. दुसरीकडे, महाराष्ट्र-कर्नाटक सामना ड्रॉ होण्याची शक्यता आहे. विदर्भ ओडिशाविरुद्धचा सामना जिंकू शकते. ओडिशाला अजून्ही 301 धावांची गरज असून विदर्भला शेवटच्या दिवशी 10 विकेट्स घ्यावा लागतील.
मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेशमुंबईने हिमाचल प्रदेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मुशीर खानच्या 112 आणि सिदेश लाडच्या 127 धावांच्या जोरावर 446 धावा केल्या. हिमाचल प्रदेशचा पहिला डाव 187 धावांवर आटोपला आणि मुंबईला 259 धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. हिमाचल प्रदेश दुसऱ्या डावात 139 धावा करू शकले. हा सामना मुंबईने एक डाव आणि 120 धावांनी जिंकला. मुंबईचा संघ ग्रुप डी मध्ये 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
उत्तर प्रदेश विरुद्ध नागालँडउत्तर प्रदेशने नागालँडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 535 धावा केल्या आणि डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करताना नागालँडचा पहिला डाव 117 धावांवर आटोपला. तर दुसऱ्या डावात नागालँडचा संघ 153 धावा करू शकला. उत्तर प्रदेशने हा सामना एक डाव आणि 265 धावांनी सामना जिंकला. उत्तर प्रदेशचा संघ 13 गुणांसह ग्रुप ए मध्ये चौथ्या स्थानावर आहे.
उत्तराखंड विरुद्ध हरयाणाउत्तराखंडने हरियाणाविरुद्ध एक डाव आणि 28 धावांनी विजय मिळवला. उत्तराखंडने पहिल्या डावात 288 धावा केल्या. पण या धावा हरयाणाला दोन्ही डावात करता आल्या नाहीत. पहिल्या डावात 122 आणि दुसऱ्या डावात 148 धावा केल्या.