आयपीएल 2026 मिनी लिलावापूर्वी जितके चांगली खेळाडू संघात घेता येतील तितका प्रयत्न फ्रेंचायझी करत आहेत. ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडू घेणं सोपं पडतं. पण लिलावात त्याच खेळाडूसाठी मोठी रक्कम मोजावी लागू शकते. त्यामुळे फ्रेंचायझी आवडत्या खेळाडूसाठी ट्रेंड विंडोच्या माध्यमातून फासे टाकतात. चेन्नई सुपर किंग्स नव्याने संघ बांधणीसाठी प्रयत्न करत आहे. मागच्या दोन पर्वात संघाची कामगिरी फार काही चांगली झाली नाही. त्यामुळे संघाचा समतोलपणा राखण्यासाठी काही खेळाडूंची गरज फ्रेंचायझीला आहे. त्यासाठी धडपड सुरु आहे. चेन्नई सुपर किंग्सची नजर राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनवर आहे. यासाठी रवींद्र जडेजा आणि सॅम करनला सोडण्याची तयारी असल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सच्या एका खेळाडूसाठी चेन्नई सुपर किंग्सने फासे टाकले होते. पण चेन्नई सुपर किंग्सच्या प्रस्तावाला गुजरात टायटन्सने केराची टोपली दाखवली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संघात घेण्यासाठी ट्रेड विंडोचं दार ठोठावलं होतं. गुजरात टायटन्सला प्रस्ताव दिला होता. मात्र गुजरात टायटन्सने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. वॉशिंग्टन सुंदर सध्या फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियात टी20 मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली. इतकंच टीम इंडियात तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो आणि त्याचा आयपीएल रेकॉर्डही चांगला आहे. सनरायझर्स हैदराबादने त्याला मेगा लिलावापूर्वी रिलीज केलं होतं. तेव्हा गुजरात टायटन्सने 3.2 कोटी मोजून त्याला संघात घेतलं. आता त्याला सोडण्याची इच्छा गुजरात टायटन्सच्या मनात नाही.
वॉशिंग्टन सुंदरचा आयपीएल प्रवासवॉशिंग्टन सुंदरने 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघातून आयपीएलचा प्रवास सुरु केला. त्यानंतर चार वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळला. सनरायझर्स हैदराबादने त्याला संघात घेतला. आता गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. वॉशिंग्टन सुंदर आतापर्यंत 66 आयपीएल सामने खेळला आहे. यात 7.69 च्या इकोनॉमी रेटने 39 विकेट घेतल्या आहेत. तसेच फलंदाजी 511 धावा केल्या आहे. मागच्या पर्वात त्याने चांगली फलंदाजी केली होती. पाच डावात 133 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट 166.25 चा होता. इतकंच काय तर वॉशिंग्टन सुंदर पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करण्याची ताकद ठेवतो.