आर्य चाणक्य हे केवळ एक कुटनीती तज्ज्ञच नव्हते तर ते एक अर्थतज्ज्ञ देखील होते, आदर्श आर्थिक व्यवहार कसा करावा? पैशांची बतच कशी करावी? पैसा कुठे खर्च करावा आणि कुठे करू नये? याबाबत अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवल्या आहेत. चाणक्य म्हणतात पैशा इतका सर्वात जवळचा माणसाचा कोणताही मित्र असू शकत नाही. तुम्हाला कोणतंही संकट येऊ द्या, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही त्या संकटातून सहज बाहेर पडतात, तुमच्या गाठीशी पैसा असेल, तुम्ही जर पैशांची बचत केली असेल तर तुमच्या आयुष्यातली आरधी संकटं गायब होतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. दरम्यान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवाच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत, ज्यामुळे व्यक्ती हा संकटात सापडू शकतो असं चाणक्य म्हणतात, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?
पैशांची उधळपट्टी – चाणक्य म्हणतात जो व्यक्ती पैशांची उधळपट्टी करतो, पैशांची बचत करत नाही, अशा व्यक्तीजवळ कधीही धन टिकत नाही. असा व्यक्ती भविष्यामध्ये कंगाल होतो, त्यामुळे पैशांचा सन्मान करायला शिका. जो व्यक्ती पैशांचा सन्मान करतो, तो श्रीमंत होतो, त्याला कधीच पैशांची कमी भासत नाही.
वाईट संगत – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीला वाईट संगत असते, जुगार, दारू यांचं व्यसन असतं असा व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीही श्रीमंत होऊ शकत नाही, त्याने किहीती पैसे कमावले कितीही कष्ट केले तर तो आपले सर्व पैसे आपल्या व्यसनांवर खर्च करतो, त्यामुळे त्याच्या हातात पैसा राहत नाही, आणि तो नंतर एखाद्या मोठ्या संकटात सापडतो.
आळशी माणूस – चाणक्य म्हणतात जगात कष्टाला पर्याय नाही, जो माणूस कष्ट करत नाही, तो या जगात फार काळ टिकू शकत नाही, तो कायम गरीब राहातो, त्यामुळे आळस सोडून माणसानं नेहमी कष्ट केले पाहिजेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)