नाशिक: सरकारी कामातून असो की घरगृहस्थीतून; निवृत्ती ही प्रत्येकाच्या आयुष्यात येते. या काळात नोकरी किंवा नियमित उत्पन्न नसल्याने आर्थिक सुरक्षिततेची गरज सर्वाधिक भासते. त्यामुळे निवृत्तीपूर्व नियोजन आणि बचत ही काळाची गरज आहे.
नागरिकांना निवृत्ती नियोजनाचे (रिटायरमेंट प्लॅन) महत्त्व समजविण्यासाठी ‘राष्ट्रीय पेन्शन योजने’विषयी (एनपीएस) मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले आहे. गुरुवारी (ता. १३) दुपारी साडेचारपासून कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा संकुलातील पलाश सभागृहात आयोजित या कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला असेल.
या कार्यक्रमात खुशबू शुक्ला (एजीएम, पीएफआरडीए), पुरुषोत्तम बेडेकर (आर्थिक नियोजनकार आणि बँकिंग तज्ज्ञ), सौरभ चतुर्वेदी (एचडीएफसी पीएफएम) मार्गदर्शन करणार आहेत. या माध्यमातून उपस्थितांच्या शंकांचे निरसन होईल. राष्ट्रीय पेन्शन योजना स्वैच्छिक असून, ती सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे.
निवृत्तीनंतर आर्थिक मदत मिळावी आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता साध्य व्हावी, हा योजनेचा उद्देश आहे. या योजनेद्वारे गुंतवणूकदारांना ‘इक्विटी एक्स्पोजर’ मिळत असल्याने दीर्घकालीन परताव्याची चांगली संधी उपलब्ध होते. लवकर सुरुवात केल्यास चक्रवाढीचा प्रभाव (पॉवर ऑफ कंपाउंडिंग) गुंतवणुकीत मोठा फरक घडवू शकतो.
एनपीएस ही शिस्तबद्ध, कर-कार्यक्षम आणि सुरक्षित पद्धतीने निवृत्तीसाठीचा निधी उभारणीची प्रभावी योजना आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) अलीकडेच एनपीएस अधिक लवचिक आणि आकर्षक बनविण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत.
याचे सखोल मार्गदर्शन या कार्यक्रमातून मिळेल. निवृत्ती ही फक्त वय नसून, एक ध्येय आहे आणि त्या ध्येयासाठी लवकर व सातत्यपूर्ण नियोजन हेच यशाचे रहस्य आहे. आपली निवृत्ती आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी या मार्गदर्शन सत्राला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांसाठी प्रवेश खुला असून, कार्यक्रमानंतर चहापानाची व्यवस्था केलेली आहे.
Rajabhau Waje : खासदार राजाभाऊ वाजेंच्या शिफारशीला यश; कांदा निर्यातीसाठी 'रोडटेप' आणि अनुदानाचे प्रस्ताव विचाराधीनकार्यक्रमात कोण-कोण सहभागी होऊ शकतो?
निवृत्तीचे नियोजन करू इच्छिणारे कर्मचारी
कंपनी एचआर, अॅडमिन अधिकारी : आपल्या कर्मचाऱ्यांच्या निश्चिंत भविष्यासाठी
लघुउद्योजक (एसएमई) : कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी
आर्थिक सल्लागार / सीए : गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन आणि शंका निरसनासाठी
विविध क्षेत्रांत व्यवसाय करीत असलेले छोटे व
मध्यम स्वरूपातील व्यापारीवर्ग